मुंबई 3 Batsman Never Get Out in ODI : क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक महान फलंदाज झाले आहेत ज्यांनी धावा आणि शतकं झळकावली आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे का की असे काही फलंदाज आहेत ज्यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील कोणताही गोलंदाज आउट करु शकला नाही. अशाच काही भारतीय फलंदाजावर एक नजर टाकूया..
सौरभ तिवारी : सौरभ तिवारीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याला धोनीचा डुप्लिकेट म्हटलं जायचं. सौरभ तिवारीचे लांब केस पाहून लोक त्याची तुलना धोनीशी करायचे. सौरभ तिवारीनं आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवलं. सौरभ तिवारीनं 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सौरभ तिवारीनं भारतीय संघासाठी फक्त तीन एकदिवसीय सामने खेळले, ज्यात तो फक्त दोन डावांत फलंदाजी करु शकला. या दोन्ही डावात सौरभ तिवारी नाबाद राहिला. यानंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. सौरभ तिवारी व्यतिरिक्त असे दोन भारतीय फलंदाज आहेत ज्यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील कोणताही गोलंदाज बाद करू शकला नाही.