वडोदरा INDW vs WIW 3rd ODI Live Stream : भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज 27 डिसेंबर (शुक्रवार) रोजी वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर खेळवला जाईल. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारतानं जिंकत मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता आजचा सामना जिंकत मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा भारताचा प्रयत्न असेल तर या सामन्यात विजय मिळवत पाहुण्यांचा संघ आपली प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करेल.
दुसऱ्या सामन्यात काय झालं : दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हरलीन देओलनं फलंदाजीत चमकदार कामगिरी करत 103 चेंडूत 115 धावा केल्या. तिच्या खेळीत 16 चौकारांचा समावेश होता. तिच्यासोबत प्रतिका रावलनंही उत्कृष्ट 76 धावा केल्या आणि स्मृती मानधनानंही 53 धावांची शानदार खेळी केली. यांच्या खेळीच्या बळावर भारतानं 50 षटकात 5 बाद 358 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजसाठी हेली मॅथ्यूजनं शानदार शतक झळकावलं आणि 109 चेंडूत 106 धावा केल्या. मात्र, त्याला इतर फलंदाजांची साथ मिळू शकली नाही. परिणामी त्यांचा डाव 46.2 षटकात 243 धावांवर संपुष्टात आला आणि भारतानं सामना 115 धावांनी जिंकला.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : भारतीय महिला क्रिकेट संघानं वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत 28 वनडे सामने खेळले आहेत, त्यापैकी भारतानं 23 सामने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजनं केवळ 5 सामने जिंकले आहेत. यावरुन भारताचं कॅरेबियन संघाविरुद्ध वर्चस्व असल्याचं दिसतंय.
खेळपट्टी कशी असेल : सामन्याच्या पूर्वार्धात कोटंबी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असेल अशी अपेक्षा आहे. गोलंदाजांना कृत्रिम प्रकाशात थोडी मदत मिळाली, जी मालिकेत पुढे जाण्यासाठी महत्त्वाची ठरु शकते. खेळपट्टी काळ्या मातीची असल्यानं खेळ पुढे जात असताना फिरकीपटूंनाही मदत मिळू शकते.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघांतील तिसरा वनडे सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघांतील तिसरा वनडे सामना आज 27 डिसेंबर (शुक्रवार) रोजी कोटांबी स्टेडियम, वडोदरा इथं सकाळी 9:30 वाजता सुरु होईल. तर याची नाणेफेक सकाळी 09:00 वाजता होईल.