महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारतीय संघ 5 वर्षांनी मालिका जिंकत इतिहास रचणार? निर्णायक मॅच 'इथं' पाहा लाईव्ह - INDW VS WIW 2ND T20I LIVE

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघांमध्ये तीन सामन्यांची T20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकत यजमान संघानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 17, 2024, 3:51 PM IST

नवी मुंबई INDW vs WIW 2nd T20I Live Streaming : भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज 17 डिसेंबर (मंगळवार) रोजी डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई इथं संध्याकाळी 07:00 वाजता खेळवला जाईल. महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर व्हाईटवॉश भोगल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघानं वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात शानदार पुनरागमन केलं आहे.

पहिला सामना भारतानं जिंकला : भारतीय महिलांनी पहिल्या T20 सामन्यात 4 बाद 195 धावा अशी भक्कम धावसंख्या उभारली. भारताची सलामीवीर स्मृती मानधनानं 33 चेंडूंत 7 चौकार आणि दोन षटकारांसह 54 धावांची शानदार खेळी केली. जेमिमाह रॉड्रिग्जनं 35 चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं 73 धावा करत यजमान संघाला स्पर्धात्मक धावसंख्येपर्यंत नेलं. तर या धावसंख्येचा बचाव करताना तीतस संधूनं तीन, तर दीप्ती शर्मा आणि राधा यादवनं प्रत्येकी दोन गडी बाद केले. अनुभवी अष्टपैलू डिआंड्रा डॉटिननं 28 चेंडूत 52 धावांची जलद खेळी खेळली, त्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ 7 बाद 146 धावांवर रोखला गेला. पाहुण्या संघानं एकतर्फी सामना 49 धावांनी गमावला.

दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड : भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाविरुद्ध एकूण 22 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत. या 22 पैकी भारतानं 14 सामने जिंकून आघाडी मिळवली आहे, तर वेस्ट इंडिजनं 8 सामने जिंकले आहेत. भारतीय महिला संघानं यापुर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये वेस्ट इंडिजसंघाविरुद्ध T20 मालिका जिंकली होती. आता पाच वर्षांनी पुन्हा भारताला मालिका विजयाची संधी मिळाली आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघातील दुसरा T20 सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?

भारतीय विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघातील दुसरा सामना 17 डिसेंबर (मंगळवार) रोजी डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई इथं संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल, ज्याची नाणेफेक संध्याकाळी 06:30 वाजता होणार आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघातील दुसऱ्या T20 सामना कुठं आणि कसा पहावा?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघातील मालिकेचे अधिकृत प्रसारण भागीदार व्हाया डॉट कॉम 18 आहे. तसंच भारतातील चाहते स्पोर्ट्स 18 1 एसडी/एचडी टीव्ही चॅनेलवर सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकतात. यासोबतच जिओ सिमेना ॲप आणि वेबसाइटवर भारत महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला दुसऱ्या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :

भारत : स्मृती मानधना, उमा छेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, सजीवन सजना, राधा यादव, सायमा ठाकोर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग.

वेस्ट इंडिज :हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शमीन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, शबिका गझनबी, एफी फ्लेचर, झैदा जेम्स, मँडी मंगरू, करिश्मा रामहरक, शमिलिया कोनेल.

हेही वाचा :

  1. चार चेंडूत लगातार 4 विकेट... T20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक 'डबल हॅट्ट्रिक'
  2. 'बॅझबॉल'च्या घरच्या मैदानावर इंग्रजांचे 'तारे जमीन पर'...! सर्वात मोठा विजय मिळवत कीवींचा 'टीम'ला 'गुड बाय'

ABOUT THE AUTHOR

...view details