वडोदरा INDW vs WIW 2nd ODI Live Streaming :भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आज 24 डिसेंबर (मंगळवार) रोजी वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर खेळवला जाईल. या मालिकेतील पहिला सामना भारतानं तब्बल 211 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता आजचा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न असेल तर या सामन्यात विजय मिळवत पाहुण्यांचा संघ मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.
पहिल्या सामन्यात भारताचा विजय : पहिल्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघानं सर्व विभागांमध्ये पाहुण्यांना मागं टाकलं, स्मृती मानधना आणि हरलीन देओल सारख्या फलंदाजांनी आणि स्वतः कर्णधाराने चांगली कामगिरी केली, तर रेणुका सिंग आणि प्रिया मिश्रा सारख्या गोलंदाजांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना त्रास दिला. तिचा चांगला फॉर्म सुरू ठेवत, स्मृती मानधना 91 धावांसह भारताची सर्वोच्च धावसंख्या ठरली, तर नवोदित प्रतीक रावल आणि हरलीन देओल सारख्या इतर फलंदाजांनी तिला साथ दिली. भारतीय आघाडीच्या फळीतील सर्व फलंदाजांनी चांगली सुरुवात केली पण मोठी शतकं झळकावण्यात त्यांना अपयश आले. गोलंदाजी विभागात, रेणुकानं पहिल्यांदाच वनडे सामन्यात पाच बळी घेतले.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा :भारतीय महिला क्रिकेट संघानं वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत 27 वनडे सामने खेळले आहेत, त्यापैकी भारतानं 22 सामने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजनं केवळ 5 सामने जिंकले आहेत.
खेळपट्टी कशी असेल : सामन्याच्या पूर्वार्धात कोटंबी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असेल अशी अपेक्षा आहे. गोलंदाजांना कृत्रिम प्रकाशात थोडी मदत मिळाली, जी मालिकेत पुढे जाण्यासाठी महत्त्वाची ठरु शकते. खेळपट्टी काळ्या मातीची असल्यानं खेळ पुढे जात असताना फिरकीपटूंनाही मदत मिळू शकते.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघांतील दुसरा वनडे सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघांतील दुसरा वनडे सामना आज 24 डिसेंबर (मंगळवार) रोजी कोटांबी स्टेडियम, वडोदरा इथं दुपारी 1:30 वाजता सुरु होईल. तर याची नाणेफेक दुपारी 01:00 वाजता होईल.