दुबई INDW vs PAKW T20I Match Ticket : ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2024 सुरु झालं आहे. या मेगा टूर्नामेंटमध्ये आज भारतीय महिला क्रिकेट संघाचा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर या सामन्यात विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
सामन्याची तिकीटे खुप दिवसांपासून खुली : यावेळी महिला T20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. ज्यात प्रत्येकी 5 च्या दोन वेगवेगळ्या गटांमध्ये संघांची विभागणी करण्यात आली आहे. भारतीय महिला संघ ग्रुप ए मध्ये आहे. ज्यात त्यांना न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचं आहे. ICC नं महिला T20 विश्वचषक सामन्यांच्या तिकीटांच्या किमती जाहीर करण्यासोबतच ऑनलाइन बुकिंग देखील सुरु केलं होतं. ज्यात आज होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान महिला संघ यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याच्या तिकिटांच्या किंमतीही उघड करण्यात आल्या होत्या.
किती आहे सामन्याचं तिकीट : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आज 6 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता खेळवला जाईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांच्यात सामना होईल. अशा परिस्थितीत आयसीसीनं दोन्ही सामन्यांचं एक तिकीट जारी केलं होतं. सर्वात कमी किमतीचं तिकीट फक्त 15 दिरहम आहे, जे अंदाजे 342 भारतीय रुपये आहे. जी किंमत एका महिन्याच्या मोबाईल रिचार्ज इतकी आहे. याशिवाय, वेगवेगळ्या स्टँडच्या तिकिटांच्या किमतीही वेगळ्या आहेत, जे 25 दिरहम म्हणजे अंदाजे 570 भारतीय रुपये आहेत. t20worldcup.platinumlist.net या ICC च्या वेबसाइटला भेट देऊन चाहते स्टेडियममधून हा सामना पाहण्यासाठी तिकीट बुक करु शकतात. त्याच वेळी, 18 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांना स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आयसीसीकडून विनामूल्य प्रवेश दिला जाईल.
पाकिस्तानी संघाविरुद्ध भारतीय महिला संघाचा आतापर्यंतचा विक्रम कसा : T20 फॉरमॅटमध्ये, भारतीय महिला संघाचा आतापर्यंत पाकिस्तानी महिला संघाविरुद्ध उत्कृष्ट विक्रम आहे. ज्यात त्यांनी पाकिस्तानी संघाविरुद्ध 15 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 12 सामने जिंकले आहेत, तर त्यांना फक्त तीन पराभव पत्करावं लागले आहेत. 2023 मध्ये झालेल्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या वेळी खेळला होता, तेव्हा त्यांनी 7 गडी राखून विजय मिळवला होता.
हेही वाचा :
- मुंबईचा 27 वर्षांचा दुष्काळ संपला; सामना अनिर्णित राहूनही 'अजिंक्य' नेतृत्वाखाली कोरलं इराणी चषकावर नाव - Mumbai Won Irani Cup