अल अमेरत IND A vs UAE Liev Streaming : ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम्स आशिया कप स्पर्धेचा आठवा सामना आज भारत A राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध UAE राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळवला जाईल. उभय संघांमधील हा सामना अल अमेरत येथील अल अमेरत क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल.
भारत अ संघाची शानदार सुरुवात : भारत अ संघानं या स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. भारत अ संघानं पहिल्या सामन्यात पाकिस्तान अ संघाचा 7 धावांनी पराभव केला. अशा स्थितीत भारत अ संघाला दुसऱ्या सामन्यात यूएईचा पराभव करुन दुसरा विजय नोंदवायचा आहे. दुसरीकडे, संयुक्त अरब अमिरातीनंही पहिल्या सामन्यात ओमानचा 4 विकेट राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला. अशा स्थितीत यूएई संघ भारत अ संघाला कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न करत आणखी एक विजय नोंदवण्याच्या प्रयत्नात असेल. त्यामुळं दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
तिलक वर्मा करणार भारताचं नेतृत्त्व : रमणदीप सिंग, नेहल वढेरा, अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, अनुज रावत, साई किशोर आणि राहुल चहर हे स्टार खेळाडूंनी भरलेल्या भारत अ संघाचं नेतृत्व करताना तिलक वर्मा दिसणार आहेत. 2023 मधील स्पर्धेच्या मागील आवृत्तीत, अंतिम फेरीत पाकिस्ताननं भारताचा 128 धावांनी पराभव केला होता.
स्पर्धेत किती संघ सहभागी : यावेळी इमर्जिंग आशिया चषक T20 फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे, ज्यात भारत आणि पाकिस्तानच्या अ संघांव्यतिरिक्त हाँगकाँग, ओमान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि यूएईचे संघही सहभागी होत आहेत. यावेळी भारतीय अ संघाला स्पर्धेत अ गटात स्थान मिळालं असून त्यात पाकिस्तान व्यतिरिक्त यूएई आणि ओमानचे संघही सहभागी आहेत.
भारत A विरुद्ध युएई सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
भारत A विरुद्ध युएई इमर्जिंग टीम्स आशिया चषकाचा आठवा सामना 21 ऑक्टोबर (सोमवार) रोजी अल अमेरत क्रिकेट ग्राउंड इथं भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक संध्याकाळी 06.30 वाजता होईल.
भारत A विरुद्ध युएई सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठं पहावं?