महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टी-20 विश्वचषकाचं महाकुंभ सुरू; पहिल्यांदाच होणार 20 संघ सहभागी, पाहा A to Z माहिती - T 20 World Cup

ICC T-20 World Cup : यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतील नऊ ठिकाणी टी-20 विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजचे सहा तर अमेरिकेचे तीन स्थान आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा टी-20 विश्वचषक असून एकूण 20 संघ सहभागी होत आहेत.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 1, 2024, 10:40 PM IST

ICC T-20 World Cup
ICC T-20 World Cup (Etv Bharat Desk)

हैदराबाद ICC T-20 World Cup : आजपासून टी-20 विश्वचषकाचा नववा हंगाम सुरु होत आहे. या स्पर्धेची सुरुवात 2 जून रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्यानं होईल. भारतीय संघ दुसऱ्यांदा या प्रकरात विश्वविजेता बनण्याकडं डोळे लावून बसला आहे. भारतीय संघानं 2007 मध्ये उद्घाटनाच्या हंगामात हे विजेतेपद पटकावलं होतं. यानंतर 17 वर्षे उलटली, पण संघाला एकदाही टी-20 विश्वचषक जिंकता आलं नाही. भारतीय संघानं 2014 मध्ये अंतिम फेरीत आणि 2016 आणि 2022 मध्ये उपांत्य फेरी गाठली होती, मात्र त्यांना विजेतेपद मिळवता आलं नव्हतं. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून खूप अपेक्षा आहेत.

सर्वात मोठा विश्वचषक : यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतील नऊ ठिकाणी टी-20 विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत. यात वेस्ट इंडिजच्या सहा तर अमेरिकेच्या तीन ठिकाणी सामने होणार आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा टी-20 विश्वचषक असून एकूण 20 संघ सहभागी होत आहेत. इंग्लंड संघ गतविजेता आहे. 2022 मध्ये पाकिस्तानचा पराभव करुन त्यांनी विजेतेपद पटकावलं होतं.

  • टी-20 विश्वचषक 2 जून (भारतीय वेळेनुसार) ते 29 जून दरम्यान होणार आहे.
  • यंदा टी-20 विश्वचषक स्पर्धेत 20 संघ सहभागी होत आहेत. यात यजमान वेस्ट इंडिज आणि अमेरिका व्यतिरिक्त भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स, इंग्लंड, आयर्लंड, कॅनडा, स्कॉटलंड, ओमान, नेपाळ, युगांडा, पापुआ न्यू गिनी आणि नामिबियाचे संघ सहभागी होत आहेत.

T20 विश्वचषकाचं स्वरुप काय :

  • पहिल्या फेरीत प्रत्येकी पाच संघांच्या गटात 20 संघ सामने खेळतील. भारताला अ गटात ठेवण्यात आलंय.
  • प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर-8 फेरीसाठी पात्र ठरतील.
  • सुपर-8 फेरीत आठ संघांची प्रत्येकी चार संघांच्या दोन गटात विभागणी केली जाईल.
  • सुपर-8 फेरीतील प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
  • दोन उपांत्य फेरीतील विजेते 29 जून रोजी टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत भिडतील.
  • भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

हेही वाचा :

  1. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे 5 फलंदाज; पहिल्या क्रमांकावर 'हा' खेळाडू - T20 World Cup 2024
  2. प्रज्ञानंदचा ऐतिहासिक विजय, 6 वेळा जागतिक चॅम्पियन झालेल्या मॅग्नस कार्लसनला केलं पराभूत - Praggnanandhaa news

ABOUT THE AUTHOR

...view details