महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

स्टेडियममध्ये बसून आंतरराष्ट्रीय T20 सामना बघायचा? ट्रेनच्या तिकिटांपेक्षा स्वस्तात मिळतंय मॅचचं तिकिट, 'असं' करा खरेदी - HOW TO BUY MATCH TICKETS

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील चार सामन्यांची T20 मालिका शुक्रवार 8 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होणार आहे.

How to Buy Match Tickets
भारतीय संघ (ANI Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 7, 2024, 2:59 PM IST

डर्बन How to Buy Match Tickets : न्यूझीलंडकडून 0-3 नं कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. 8 नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमध्ये चार T20 सामन्यांची मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील पहिला सामना डर्बनमध्ये खेळवला जाईल. या मालिकेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवणार असून, यश दयाल, विजयकुमार वैशाक आणि रमणदीप सिंग यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. हे तिन्ही खेळाडू आगामी मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकतात. या सामन्याची तिकिटं कशी खेरदी करायची याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

व्हीव्हीएस लक्ष्मण असणार भारतीय संघाचे प्रशिक्षक : विशेष म्हणजे या मालिकेत व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे. 22 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघालाही ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायचं आहे. वृत्तानुसार, भारतीय संघ 10 नोव्हेंबरला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी रवाना होणार आहे. अशा परिस्थितीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. मग या परिस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघासोबत असणार आहेत.

मालिकेचं वेळापत्रक :

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला T20 सामना - 08 नोव्हेंबर, डर्बन
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा T20 सामना - 10 नोव्हेंबर, गकबेराह
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20 सामना - 13 नोव्हेंबर, सेंच्युरियन
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा T20 सामना - 15 नोव्हेंबर, जोहान्सबर्ग

दोन्ही संघाचा हेड-टू-डेह रेकॉर्ड काय : दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघ यांच्यात आतापर्यंत एकूण 27 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. ज्यात भारतीय संघाचा वरचष्मा दिसत आहे. यात भारतीय संघानं 15 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेनं 11 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला. इतकं स्पष्ट आहे की जेव्हा जेव्हा दोन्ही संघ T20 मध्ये आमनेसामने येतात तेव्हा ही एक रोमांचक होतो. मात्र, दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर पराभूत करणं भारतासाठी इतकं सोपं नसेल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत T20 सामन्याची तिकिटं ऑनलाइन कशी खरेदी करावी?

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील T20 मालिकेसाठी तिकिटं उपलब्ध करुन दिली आहेत. क्रिकेट चाहते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत ऑनलाइन तिकिटं खरेदी करु शकतात, जी आता थेट आणि वेगानं विकली जात आहे. तिकिटांच्या किंमती 175 दक्षिण आफ्रिकन रॅंड म्हणजेच जवळपास 844 भारतीय रुपये ते 225 दक्षिण आफ्रिकन रॅंड म्हणजेच जवळपास 1085 भारतीय रुपयांपर्यंत आहेत. या मालिकेतील सर्व सामन्यांचे तिकिट खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

मालिकेसाठी दोन्ही संघ :

भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, टिळक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशक, आवेश खान, यश दयाल.

दक्षिण आफ्रिका संघ : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, जेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली एमपोन्गवाना, नकाबा पीटर, रायन सिमेलेटोन, लुईस रिकेलटन, आणि सिपमला (तीसरा आणि चौथा T20I), ट्रिस्टन स्टब्स.

हेही वाचा :

  1. पाकिस्तानचा संघ 7 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात वनडे सामना जिंकणार? 'करो किंवा मरो' मॅच 'इथं' दिसेल विनामुल्य लाईव्ह
  2. Live सामन्यात फील्ड सेटिंगवरुन गोलंदाजाचं कर्णधारासोबत भांडण, रागाच्या भरात सोडलं मैदान, अन्...; पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details