बेंगळुरु How To Buy IND vs NZ 1st Test Match Tickets : भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 16 ऑक्टोबर (बुधवार) पासून बेंगळुरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 साठी अंतिम पात्रता सुरु असताना, भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका अतिशय रोमांचक होण्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही तिकिटे कशी खरेदी करावी? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर याचं उत्तर या बातमीत मिळेल.
न्यूझीलंडची अग्निपरीक्षा : एकिकडे रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बांगलादेशवर 2-0 नं शानदार विजय मिळवून प्रवेश करेल आणि घरच्या मैदानावर आणखी एक उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे भारताच्या विपरीत, न्यूझीलंड या मालिकेत थोड्या खराब फॉर्मसह उतरणार आहे, कारण त्यांना कसोटी मालिकेत श्रीलंकेकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला आहे. गॉलमध्ये खेळल्या गेलेल्या दोन्ही कसोटीत किवी फलंदाजांना श्रीलंकेच्या फिरकीपटूंना कसं सामोरं जावं हे अजिबात समजलं नाही. जर किवींना रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आव्हान द्यायचं असेल तर त्यांना खूप चांगला खेळ करावा लागेल.
हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघाचा वरचष्मा राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 62 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात भारतीय संघानं 22 सामने जिंकले. तर न्यूझीलंडनं 13 सामने जिंकले आहेत. याशिवाय 27 कसोटी सामना अनिर्णित राहिले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात खेळताना भारतानं 17 कसोटी सामने जिंकले आहेत. तर 2 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक :
- पहिली कसोटी - 16 ते 20 ऑक्टोबर (एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू)
- दुसरी कसोटी - 24 ते 28 ऑक्टोबर (एमसीए स्टेडियम, पुणे)
- तिसरी कसोटी - 1 ते 5 नोव्हेंबर (वानखेडे स्टेडियम, मुंबई)