जेद्दाह IPL Mega Auction 2025 : सौदी अरेबियातील जेद्दाह इथं 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या IPL मेगा लिलावात एकूण 574 खेळाडू सहभागी होणार आहेत. यापैकी 366 भारतीय आणि 208 परदेशी आहेत, ज्यात सहयोगी संघातील तीन खेळाडूंचा समावेश आहे. तर 330 अनकॅप्ड खेळाडूंपैकी 318 भारतीय आणि 12 परदेशी आहेत. एकूण 204 स्लॉट भरायचे आहेत, त्यापैकी 70 परदेशी खेळाडूंसाठी उपलब्ध आहेत. यावेळी सौदीतील खेळाडूंवर पैशांचा मोठा वर्षाव होणार आहे.
5 संघ कर्णधाराच्या शोधात : यावेळी श्रेयस अय्यर, केएल राहुल, अर्शदीप सिंग आणि ऋषभ पंत या खेळाडूंचा लिलावात समावेश आहे. यामुळं ते अधिकच मनोरंजक बनलं आहे. तसंच 5 IPL संघांची नजर लिलावात कर्णधारावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांमध्ये सध्या कर्णधार नाही.
यावेळी लिलावात किंमत किती : यावेळी आयपीएल मेगा लिलावात 641 कोटी रुपये पणाला लागणार आहेत. 2022 मध्ये आयपीएल लिलावात संघांनी सर्वाधिक खर्च केला होता. तेव्हा मेगा लिलावात खेळाडूंच्या खरेदीसाठी 551.7 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
लिलावात कोणत्या वर्षी किती रुपये खर्च झाले?
- 2008- 36.43 दशलक्ष अमेरिकन डॉलर
- 2009- 7.65 दशलक्ष अमेरिकन डॉलर
- 2010- 3.65 दशलक्ष अमेरिकन डॉलर
- 2011- 62.775 दशलक्ष अमेरिकन डॉलर
- 2012- 10.995 दशलक्ष अमेरिकन डॉलर
- 2013- 11.885 दशलक्ष अमेरिकन डॉलर
- 2014- 262.6 कोटी रुपये
- 2015- 87.6 कोटी रुपये
- 2016- 136 कोटी रुपये
- 2017- 91 कोटी रुपये
- 2018- 431 कोटी रुपये
- 2019- 106.8 कोटी रुपये
- 2020- 140.3 कोटी रुपये
- 2021- 145.3 कोटी रुपये
- 2022- 551.7 कोटी रुपये
- 2023- 167 कोटी रुपये
- 2024- 230.45 कोटी रुपये