महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारतीयांसाठी अनोळखी असणाऱ्या गोल्फचा काय आहे इतिहास? मागील ऑलिम्पिकमध्ये पदकानं हुलकावणी दिलेल्या 'आदिती'ला यंदा पदक मिळेल? - Paris Olympics 2024

Paris Olympics 2024 : भारतीयांसाठी अनोळखी असलेल्या गोल्फमध्ये आदिती अशोकनं गेल्या ऑलिम्पिकमध्ये दमदार प्रदर्शन करत सर्वांची मनं जिंकली होती. या ऑलिम्पिकमध्येही तिच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील. मात्र या गोल्फचा नेमका इतिहास काय, भारताचे किती खेळाडू यात प्रदर्शन करणार आहेत, जाणून घ्या...

Paris Olympics 2024
आदिती अशोक (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 4:16 PM IST

नवी दिल्ली Paris Olympics 2024 : गेल्या ऑलिम्पिकमध्ये, आदिती अशोक टोकियोत दमदार प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होती. तिनं पदकापेक्षा आपल्या खेळानं सर्वांची मनं जिंकली होती. कारण तिनं अशा खेळात ही कामगिरी केली, जो भारतीयांसाठी एक परका खेळ आहे.

आदितीकडून पदकाची आपेक्षा : अदितीच्या कामगिरीनं गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय चाहत्यांना स्पर्धेच्या अंतिम दिवशी गोल्फचं अनुसरण करण्यास भाग पाडलं होतं. कारण ती पदकाच्या शर्यतीत होती. त्या खेळाबद्दल काही माहिती नसतानाही भारतीय त्या खेळाकडे तत्परतेनं पाहत होता. ती अदिती अशोक पुन्हा एकदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दिसणार आहे आणि भारतीय क्रीडाप्रेमींना आशा आहे की ती तिच्या मागील कामगिरीत सुधारणा करत यावेळीही पदक जिंकेल. पॅरिस ऑलिम्पिकच्या अगोदर, ऑलिम्पिकमधील गोल्फचा इतिहास, भारतीय संघ आणि ऑलिंपिकमधील गोल्फमधील भारताच्या सहभागाविषयी जाणून घेऊया.

गोल्फचा ऑलिम्पिक इतिहास : गोल्फचा इतिहास खूप जुना आहे, पण आत्तापर्यंत या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये खुप कमी काळासाठी समावेश करण्यात आला आहे. सर्वप्रथम 1900 च्या ऑलिम्पिक मध्ये याचा समावेश करण्यात आला आणि 1904 च्या ऑलिम्पिकमध्ये पुन्हा खेळला गेला. तथापि, नंतर याला ऑलिम्पिक चार्टरमधून काढून टाकण्यात आलं आणि 112 वर्षांच्या अंतरानंतर हा खेळ ऑलिम्पिकमध्ये परतला. रिओ 2016 आणि टोकियो 2020 मध्ये खेळांच्या यादीत गोल्फचा समावेश करण्यात आला होता. 1904 चं ऑलिम्पिक वगळता प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि महिलांच्या वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. 1904 मध्ये, पुरुष स्पर्धा आणि पुरुष सांघिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. अमेरिका हा 5 सुवर्णांसह 13 पदकं जिंकणारा गोल्फमधील सर्वात यशस्वी देश ठरला आहे. तर या खेळात तीन पदकांसह ग्रेट ब्रिटन दुसऱ्या स्थानावर आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय चमू :

शुभंकर शर्मा :

जागतिक क्रमवारीत 173व्या क्रमांकावर असलेला शुभंकर आपली उल्लेखनीय कामगिरी कायम राखण्याच्या उद्देशानं यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये प्रदर्शन करेल. त्यानं या वर्षी 17 स्पर्धा खेळल्या आहेत. त्यापैकी त्यानं 14 मध्ये 'कट' मिळवला आहे, म्हणजे फक्त 3 स्पर्धा होत्या ज्यात तो दोन फेऱ्यांच्या पुढं जाऊ शकला नाही. याव्यतिरिक्त, यात दोन टॉप-टेन फिनिशचा समावेश आहे. या वर्षातील प्रमुख चॅम्पियनशिप 'द ओपन' मधील त्याच्या कामगिरीमुळं त्याचा आत्मविश्वास वाढेल, कारण तो 80 गोल्फर्समध्ये 19व्या क्रमांकावर असताना स्पर्धा पूर्ण करेल. भारतासाठी पदक जिंकणं अजूनही कठीण काम आहे, पण त्यानं गेल्या स्पर्धेतील आपला फॉर्म कायम ठेवल्यास ते फारसं अवघड जाणार नाही.

गगनजीत भुल्लर :

जागतिक क्रमवारीत 295व्या क्रमांकावर असलेल्या गगनजीतसाठी पोडियम फिनिश शक्यता कमी आहे. पण इतक्या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव त्याला नक्कीच उपयोगी पडेल. गेल्या दोन वर्षांत, त्यानं फक्त दोन डीपी वर्ल्ड टूर इव्हेंटमध्ये भाग घेतला आहे आणि दोन्हीमध्ये त्यानं 'कट' केला आहे. त्यानं नुकत्याच झालेल्या 'हिरो इंडियन ओपन' स्पर्धेत 58 वं स्थान पटकावलं आणि त्यामुळं ऑलिम्पिक त्याच्यासाठी एक कठीण आव्हान असेल.

अदिती अशोक :

अदितीनं चार वर्षांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या चमकदार कामगिरीनं आपली छाप सोडली होती. परंतु, यावेळी तिला पोडियम फिनिशसह खेळावर वर्चस्व गाजवायचं आहे. ती सध्या जगभरात 61व्या क्रमांकावर आहे. परंतु यापूर्वी तिनं आणखी चांगली कामगिरी केली आहे. मात्र, तिची अलीकडची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. तिनं 'डाऊ चॅम्पियनशिप'मध्ये 'कट' मिळवता आला नाही. तिनं दोन स्पर्धांमध्ये टॉप-20 मध्ये आणि इतर दोन स्पर्धांमध्ये टॉप-30 च्या खाली स्थान मिळवलं.

दिक्षा डागर :

जागतिक क्रमवारीत 164व्या क्रमांकावर असलेली ही खेळाडू दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. या वर्षी तिनं चांगली कामगिरी केली असली तरी अव्वल-स्तरीय स्पर्धांमध्ये तिची खराब कामगिरी ऑलिम्पिकमधील तिच्या खेळात बाधा आणू शकते.

हेही वाचा :

  1. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतर देशांकडून खेळणारे 'हे' खेळाडू भारतीय वंशाचे; मुंबईच्याही एका खेळाडूचा समावेश' - Paris Olympics 2024
  2. आयओसीच्या सदस्यपदी नीता अंबानींची फेरनिवड; आयओसीमध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्याच भारतीय महिला - Paris Olympics 2024

ABOUT THE AUTHOR

...view details