चेन्नई R Ashwin On Hindi : क्रिकेटचा खेळपट्टी असो किंवा युट्यूब चॅनेल, माजी भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन उघडपणे 'खेळतो'. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही, तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफी असो किंवा इतर कोणताही मुद्दा असो, अजूनही चर्चेत आहे. मात्र, यावेळी त्याच्या एका विधानामुळं तो वादात सापडण्याची शक्यता आहे. त्यानं हिंदीबद्दल असं काही म्हटलं आहे ज्यानं वाद निर्माण होऊ शकतं.
कॉलेजच्या कार्यक्रमात अश्विनचं भाषण : माजी भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विननं अलीकडंच एका खाजगी महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यानी विद्यार्थ्यांना भाषण दिलं. भाषणाच्या सुरुवातीला त्यानं विचारलं की ते कोणत्या भाषेत ऐकायला आवडेल. अश्विननं प्रथम विद्यार्थ्यांना इंग्रजीत भाषण ऐकण्याच्या त्यांच्या इच्छेबद्दल विचारलं परंतु खास प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर त्यानं तमिळसाठी तोच प्रश्न विचारला, ज्यावर विद्यार्थ्यांनी उत्साह उत्तर दिलं. शेवटी त्यानं हिंदीबाबत विचारलं, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावर अश्विन म्हणाला, "हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही कार्यालयीन भाषा आहे." यानंतर तिथं उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी अश्विनच्या या विधानाचं कौतुक केलं. परंतु सोशल मीडियावर या वक्तव्यावर संमिश्र परिणाम दिसून येत आहे. काही लोक अश्विनच्या विधानाचं समर्थन करत आहेत, तर काही लोक ते वादग्रस्त मानत आहेत.