महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बंगळुरूचा सलग दुसरा विजय; जॅक-कोहलीच्या दमदार फलंदाजीनं घरच्या मैदानावर गुजरातचा पराभव - GT vs RCB Live Score - GT VS RCB LIVE SCORE

GT vs RCB Live Score :आयपीएल 2024 च्या 45 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना गुजरातनं 20 षटकात तीन गडी गमावून 200 धावा केल्या. बंगळुरूनं 9 विकेट राखून 16 षटकात 201 धावांचं लक्ष्य पार करत सहज विजय मिळवलाय.

GT vs RCB Live Score
GT vs RCB Live Score

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 28, 2024, 3:34 PM IST

Updated : Apr 28, 2024, 7:07 PM IST

अहमदाबादGT vs RCB Live Score :आयपीएल 2024 च्या 45 व्या सामन्यात, गुजरात टायटन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातनं 20 षटकात तीन गडी गमावून 200 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं IPL 2024 मध्ये सलग दुसरा विजय मिळवला आहे. संघानं 45 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 9 विकेट्सनं पराभव केला. बंगळुरूनं 201 धावांचं लक्ष्य 16 षटकांत एक गडी गमावून पूर्ण केलंय. विल जॅकनं 41 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीनं 44 चेंडूत 70 धावांचं नाबाद अर्धशतक झळकावलं. दोघांनी 74 चेंडूत 166 धावांची भागीदारी केली.

साई सुदर्शनची 84 धावांची नाबाद खेळी :प्रथम फलंदाजी करताना गुजरातनं आरसीबीसमोर 201 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. गुजरात टायटन्सनं 20 षटकांत तीन गडी गमावून 200 धावा केल्या. साई सुदर्शननं सर्वाधिक धावा केल्या. त्यानं 49 चेंडूंत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 84 धावांची नाबाद खेळी खेळली. स्वप्नील सिंगनं पहिल्याच षटकात ऋद्धिमान साहाला (5) पायचीत केलं. कर्णधार शुभमन गिल (16) सातव्या षटकात ग्लेन मॅक्सवेलचा बळी ठरला. अशा परिस्थितीत सुदर्शन आणि शाहरुख खान यांनी परिस्थिती चांगल्या पद्धतीनं हाताळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. शाहरुखनं 30 चेंडूत 58 धावा केल्या. त्यानं 3 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याचे हे आयपीएलमध्ये पहिलेच अर्धशतक आहे. यानंतर सुदर्शननं डेव्हिड मिलरसोबत (19 चेंडूंत नाबाद 26 धावा करत दोन चौकार आणि एक षटकार ठोकला. त्यांच्यात चौथ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी झाली.

ग्लेन मॅक्सवेलचं पुनरागमन :अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचं पुनरागमन झालं आहे. गेल्या काही सामन्यांपासून तो ब्रेकवर होता. चालू मोसमात GT तसंच RCB प्रथमच आमनेसामने येणार आहेत. गुजरातनं आतापर्यंत 9 पैकी चार सामने जिंकले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाला त्यांच्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्याच वेळी, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीनं नऊपैकी केवळ दोन सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत हा संघ दहाव्या स्थानावर आहे. मागील सामन्यात आरसीबीनं सनरायझर्स हैदराबादचा 35 धावांनी पराभव केला होता. सलग सहा पराभवानंतर बेंगळुरूनं विजयाची चव चाखली होती.

  • गुजरात टायटन्स प्लेइंग 11 : शुभमन गिल (कर्णधार), ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा.
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर प्लेइंग 11 : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल.
Last Updated : Apr 28, 2024, 7:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details