वडोदरा GGW vs UPW 3rd T20 Live Streaming : गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स महिला क्रिकेट संघात महिला प्रीमियर लीग 2025 चा तिसरा सामना आज 16 फेब्रुवारी (रविवार) रोजी कोटाम्बी स्टेडियम, वडोदरा इथं खेळवला जाईल. WPL 2025 च्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभव पत्करल्यानंतर अॅशले गार्डनरच्या नेतृत्वाखालील गुजरात संघ या सामन्यात पुनरागमन करण्यास उत्सुक असेल. तर यूपी वॉरियर्स संघ स्पर्धेतील आपला पहिलाच सामना खेळणार आहे.
पहिल्या सामन्यात गुजरातचा पराभव :पहिल्या सामन्यात गुजरातची कर्णधार अॅश गार्डनरनं सर्वोत्तम कामगिरी केली होती. तिनं केवळ 37 चेंडूत तीन चौकार आणि आठ षटकारांसह नाबाद 79 धावा केल्या आणि तिच्या संघाला 201/5 पर्यंत पोहोचवलं. मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि सोडलेले झेल यामुळं गुजरात जायंट्सना मोठा फटका बसला कारण त्यांना लक्ष्याचं रक्षण करण्यात अपयश आलं. परिणामी त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
यूपीचा पहिलाच सामना :यूपी वॉरियर्सबद्दल बोलायचं झालं तर हा त्यांचा या हंगामातील पहिलाच सामना आहे. यात ते विजयानं सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. यासाठी चामारी अथापथू, ग्रेस हॅरिस, ताहलिया मॅकग्रा आणि कर्णधार दीप्ती शर्मा सारख्या खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. गेल्या हंगामात चौथ्या स्थानावर राहिल्यानं यूपी वॉरियर्सला डब्ल्यूपीएल प्लेऑफमध्ये स्थान मिळण्यास मुकावं लागलं आणि यावेळी ते त्यांची कामगिरी सुधारण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतील.
हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स आतापर्यंत एकूण चार वेळा एकमेकांसमोर आले आहेत. या सामन्यांमध्ये यूपी वॉरियर्सनं वरचढ कामगिरी केली आहे, कारण त्यांनी तीन वेळा गुजरात जायंट्सला पराभूत केलं आहे. आतापर्यंत गुजरात संघाला फक्त एकदाच यूपी वॉरियर्सला हरवण्यात यश आले आहे. येत्या सामन्यांमध्ये गुजरात जायंट्स हा विक्रम बदलू शकेल का की यूपी वॉरियर्स आपला दबदबा कायम ठेवेल हे पाहणं रंजक ठरेल.
वडोदऱ्याची खेळपट्टी कशी असेल :वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगला असेल आणि इथं भरपूर धावा होण्याची शक्यता आहे. मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते. पण एकंदरीत ही फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी असेल. पहिल्या दोन सामन्यात जसं दिसून आले. दोन्ही संघ या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळं नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
महिला प्रीमियर लीगमधील गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स संघातील तिसरा सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?