अहमदाबादGT vs DC Live Score IPL 2024 Updates : आजचा आयपीएल सामना गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्लीनं नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. प्रथम फलंदाजी करताना गुजरातनं दिल्लीला 49 धावांचं लक्ष्य दिलं. प्रत्यूत्तरात दिल्ली संघानं हे आव्हान यशस्वीपणे पेलून विजय संपादन केला. यावेळी दिल्लीनं गुजरातवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला.
दिल्लीच्या दमदार सुरुवात :गुजरातच्या 90 धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाची सुरुवात दमदार झाली. दिल्लीनं पहिल्या षटकात 14 धावा केल्या, पण दुसऱ्या षटकात जेक प्रेझरच्या रूपानं त्यांना पहिला धक्का बसला. जेकनं 10 चेंडूत 20 धावा केल्या. त्यानंतर पृथ्वी शॉही मोठ्या फटकेबाजीत बाद झाला. त्याला केवळ 7 धावा करता आल्या. त्यानंतर अभिषेक पोरेल आणि शाई होपच्या रूपानं दिल्लीला दोन धक्के बसले. पण त्यानंतर ऋषभ पंत मैदानात आला आणि त्यानं दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
चांगली फलंदाजी करण्यात जीटीला अपयश : नाणेफेक हारल्यानंतर गुजरात टायटन्सनं 17.3 षटकात 89 धावा केल्या. गुजरातकडून राशिद खाननं सर्वाधिक धावा केल्या. आठव्या क्रमांकावर आलेल्या राशिदनं 24 चेंडूंत 31 धावा केल्या, ज्यात दोन चौकार तसंच एका षटकाराचा समावेश आहे. डीसीचा कर्णधार ऋषभ पंतनं दोन झेल घेतले. जीटीच्या केवळ 48 धावांतच 6 विकेट पडल्या. कर्णधार शुभमन गिल (8), अभिनव मनोहर (8), रिद्धिमान साहा (2), मोहित शर्मा (2), डेव्हिड मिलर (2) आणि नूर अहमद (1) यांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. साई सुदर्शननं 12 आणि राहुल तेवतियानं 10 धावांचं योगदान दिलं. शाहरुख खानला खातंही उघडता आलं नाही. दिल्लीतर्फे मुकेश कुमारनं तीन, इशांत शर्मा आणि ट्रिस्टन स्टब्सनं प्रत्येकी दोन गडी बाद केले. खलील अहमद आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.