नवी दिल्ली Neeraj Chopra in Diamond League Final : भारताचा डबल ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रानं पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांची निराशा केली आहे. नीरज चोप्रा डायमंड लीग 2024 चं विजेतेपद मिळवू शकला नाही. भारतीय चाहत्यांना त्याच्याकडून विजेतेपदाची अपेक्षा होती पण नीरजला तसं करता आलं नाही. यापूर्वी चोप्रानं 89.49 मीटर फेक करत डायमंड लीग मीटिंग सिरीजमध्ये दुसरं स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
दीर्घकाळापासून नीरज दुखापतीनं त्रस्त : वास्तविक, नीरज चोप्रा दीर्घकाळापासून कंबरेच्या दुखापतीनं त्रस्त आहे. ज्यामुळं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यात तो अपयशी ठरला होता आणि आता त्याचा प्रभाव डायमंड लीग 2024 च्या अंतिम फेरीतही दिसून आला. याचा परिणाम असा झाला की नीरज विजेतेपद मिळविण्यापासून फक्त 1 सेंटीमीटर कमी पडला.
नीरज चोप्राचं विजेतेपद 1 सेंटीमीटरनं हुकलं : डायमंड लीग 2024 चा अंतिम सामना शनिवारी रात्री ब्रुसेल्समध्ये खेळला गेला. या अंतिम स्पर्धेत, भारताचा अव्वल शॉट पुट थ्रोअर नीरज चोप्रानं 87.86 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरं स्थान मिळविलं. यासह तो सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचा विजेता होण्यापासून मुकला आहे. नीरजचं ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची संधीही अशीच हुकली होती.
पीटर्स ठरला डायमंड लीगचा विजेता : या अंतिम सामन्यात ग्रेनेडियन भालाफेकपटू अँडरसन पीटर्स 87.87 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह विजेता ठरला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरजनंतर पीटर्सनं कांस्यपदक जिंकलं होतं. आता नीरज चोप्रा डायमंड लीगमध्ये फक्त 1 सेंटीमीटरनं त्याच्या मागे राहिला. यासोबतच जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं या स्पर्धेत 85.97 मीटर फेक केली आणि नीरज चोप्रानंतर तिसरा क्रमांक पटकावला.
हेही वाचा :
- नीरज चोप्राची 'डायमंड' कामगिरी; दुखापतीनं त्रस्त असतानाही फेकला सर्वोत्कृष्ट थ्रो - Diamond League 2024
- मनू भाकर अन् नीरज चोप्राच्या लग्नाची चर्चा, मनूच्या आईनं दिली 'ही' प्रतिक्रिया - Neeraj Chopra Manu Bhaker
- सुवर्णपदक गमावूनही नीरज चोप्रानं रचला इतिहास; ऑलिम्पिकमध्ये 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय खेळाडू - NEERAJ CHOPRA OLYMPIC RECORDS