जेद्दाह IPL Auction Update Day 2 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 हंगामाचा दोन दिवसीय मेगा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया इथं सुरु आहे. पहिल्या दिवशी (24 नोव्हेंबर) सर्व 10 संघांनी एकूण 467.95 कोटी रुपये खर्च करुन 72 खेळाडूंना खरेदी केलं. यानंतर आता आज दुसऱ्या दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी (25 नोव्हेंबर) लिलाव होणार आहे.
.@LucknowIPL fans, please welcome Akash Deep 🙌🙌
— IndianPremierLeague (@IPL) November 25, 2024
He's SOLD for INR 8 Crore 👌👌#TATAIPLAuction | #TATAIPL
अजिंक्य राहाणे, पृथेवी शॉला मिळाला नाही खरेदीदार : लिलावाच्या आज दुसऱ्या दिवशी सुरुवातीला अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. यात ग्लेन फिलिप्स, केन विल्यमसन, शार्दुल ठाकूर, अजिंक्य राहाणे, पृथ्वी शॉ हे खेळाडू अनसोल्ड राहिले. तर दिग्गज फलंदाज फाफ डु प्लेसिसला दिल्लीनं त्याच्या आधारभूत किंमतीत म्हणजे 2 कोटी रुपयांत खरेदी केलं.
He brings solid experience! 👌
— IndianPremierLeague (@IPL) November 25, 2024
Bhuvneshwar Kumar goes the #RCB way for INR 10.75 Crore! 👏 👏#TATAIPLAuction | #TATAIPL | @BhuviOfficial | @RCBTweets pic.twitter.com/zY9h8yQAkk
दुसऱ्या दिवशी आतापर्यंत खरेदी झालेल्या खेळाडूंची यादी :
- रोव्हमन पॉवेल (वेस्ट इंडिज) : 1.5 कोटी, कोलकाता नाइट रायडर्स (आधारभूत किंमत : 1.5 कोटी)
- फाफ डू प्लेसिस (दक्षिण आफ्रिका) : 2 कोटी, दिल्ली कॅपिटल्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- वॉशिंग्टन सुंदर (भारत) : 3.20 कोटी, गुजरात टायटन्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- सॅम कुरन (इंग्लंड) : 2.40 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- मार्को जॅन्सेन (दक्षिण आफ्रिका) : 7 कोटी, पंजाब किंग्स (आधारभूत किंमत : 1.25 कोटी)
- कृणाल पंड्या (भारत) : 5.75 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- नितीश राणा (भारत) : 4.20 कोटी, राजस्थान रॉयल्स (आधारभूत किंमत : 1.5 कोटी)
- रायन रिकेल्टन (दक्षिण आफ्रिका) : 1 कोटी रुपये, मुंबई इंडियन्स (आधारभूत किंमत : 1 कोटी)
- जोश इंग्लिस (ऑस्ट्रेलिया) : 2.6 कोटी, पंजाब किंग्ज (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- भुवनेश्वर कुमार (भारत) : 10.75 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आधारभूत किंमत : 2 कोटी)
Prithvi Shaw remains UNSOLD! #TATAIPLAuction | #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) November 25, 2024
- तुषार देशपांडे (भारत) : 6.5 कोटी, राजस्थान रॉयल्स (आधारभूत किंमत : 1 कोटी)
- गिराल्ड कोएत्झी (दक्षिण आफ्रिका) : 2.40 कोटी, गुजरात टायटन्स (आधारभूत किंमत : 1.25 कोटी)
- मुकेश कुमार (भारत) : 8 कोटी, दिल्ली कॅपिटल्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- दीपक चहर (भारत) : 9.25 कोटी, मुंबई इंडियन्स (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- आकाश दीप (भारत) : 8 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स (आधारभूत किंमत : 1 कोटी)
- लॉकी फर्ग्युसन (न्यूझीलंड) : 2 कोटी, पंजाब किंग्ज (आधारभूत किंमत : 2 कोटी)
- अल्लाह गझनफर (अफगाणिस्तान) : 4.80 कोटी, मुंबई इंडियन्स (आधारभूत किंमत : 75 लाख)
Faf du Plessis will play for @DelhiCapitals 💥
— IndianPremierLeague (@IPL) November 25, 2024
He is acquired for INR 2 Crore 👌👌
Huge cheer from the #DC fans in the arena!#TATAIPLAuction | #TATAIPL
आज होणार 132 खेळाडूंची विक्री : दुसऱ्या दिवशी 132 खेळाडूंची विक्री होणार आहे. या खरेदी करण्यासाठी, सर्व 10 संघांच्या पर्समध्ये एकूण 173.55 कोटी रुपये शिल्लक आहेत. दुसऱ्या दिवशी फाफ डु प्लेसिस, ग्लेन फिलिप्स, सॅम कुरन, केन विल्यमसन, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, लॉकी फर्ग्युसन, टीम डेव्हिड, विल जॅक, नवीन उल हक, स्टीव्ह स्मिथ यांसारखे मोठे खेळाडू लिलावात उतरतील.
Ajinkya Rahane remains UNSOLD! #TATAIPLAuction | #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) November 25, 2024
पंत ठरला सर्वात महागडा : पहिल्या दिवशी एकूण 72 खेळाडूंना खरेदी करण्यात आलं. ज्यावर फ्रँचायझींनी तब्बल 467.95 कोटी रुपये खर्च केले. तर 12 खेळाडूंना कोणत्याही संघानं खरेदी करण्यास रस दाखवला नाही. लिलावाच्या पहिल्याच दिवशी यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं इतिहास रचला. पंत आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा (expensive players in auction) खेळाडू ठरला आहे. पंतला लखनऊ सुपर जायंट्सनं (LSG) 27 कोटी रुपयांना खरेदी केलं. पंतनं श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला, ज्याला पंजाब किंग्जनं (PBKS) 26.75 कोटी रुपयांना त्याच्या 5 मिनिटांआधी लिलावात विकत घेतलं. या मेगा लिलावात 577 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.
Day 1⃣ of the #TATAIPLAuction ✅
— IndianPremierLeague (@IPL) November 25, 2024
Here's how the 1⃣0⃣ Squads stack up 👌
What do we have in store on Day 2⃣ today❓ 🤔#TATAIPL pic.twitter.com/m0OM3zXooz
श्रेयसला पंजाबनं तर व्यंकटेशला केकेआरनं घेतलं विकत : पंतशिवाय, श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जनं (PBKS) 26.75 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं. अशाप्रकारे श्रेयस आता आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. तिसरा क्रमांक व्यंकटेश अय्यरचा आहे. त्याला बॉलीवूड स्टार शाहरुख खानच्या टीम कोलकाता नाइट रायडर्सनं (KKR) 23.75 कोटी रुपयांत विकत घेतले. हा स्टार खेळाडू गेल्या मोसमापर्यंत केकेआर संघाकडून खेळत होता. पण यावेळी केकेआरनं व्यंकटेशला रिटेन केलं नाही. अशा स्थितीत वेंकटेशला लिलावात विकत घेण्यासाठी केकेआरला आपली सर्व ताकद वापरावी लागली.
We have got an action-packed Day 2 ahead at the #TATAIPLAuction in Jeddah!
— IndianPremierLeague (@IPL) November 25, 2024
Time to look at the remaining purse 💰 of the 🔟 franchises 🔽 #TATAIPL pic.twitter.com/Okw3mXDY1s
IPL लिलावातील सर्वात महागडे खेळाडू (भारतीय रुपयांत) :
- 27 कोटी - ऋषभ पंत (LSG, 2025)
- 26.75 कोटी - श्रेयस अय्यर (PBKS, 2025)
- 24.75 कोटी - मिचेल स्टार्क (KKR, 2024)
- 23.75 कोटी - व्यंकटेश अय्यर (KKR, 2025)
- 20.50 कोटी - पॅट कमिन्स (SRH, 2024)
- 18.50 कोटी - सॅम कुरन (PBKS, 2023)
हेही वाचा :