मुंबई 11 Players Bowled : T20 क्रिकेटमध्ये तुम्ही अनेकदा फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात विश्वविक्रम बनवताना पाहिलं असेल, पण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दिल्लीच्या संघानं 11 खेळाडूंना गोलंदाजी करुन विश्वविक्रम केला. मणिपूरविरुद्धच्या या सामन्यात दिल्लीच्या संघानं सर्व 11 खेळाडूंना गोलंदाजी करायला दिली. T20 क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच पाहायला मिळालं आहे. यापूर्वी, टी-20 च्या एका डावात सर्वाधिक 9 गोलंदाजांचा वापर केला जात होता. परंतु आता दिल्लीनं काहीतरी आश्चर्यकारक केलं आहे.
सर्व 11 खेळाडूंनी केली गोलंदाजी :या सामन्यात मणिपूरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर कंगबम प्रियोजीत सिंग 0 धावांवर बाद झाला. यानंतर दिल्लीचा कर्णधार आयुष बधोनीनं अशी रणनीती अवलंबली जी खरोखरच आश्चर्यकारक होती. त्यानं आपल्या संघातील सर्व खेळाडूंना गोलंदाजी केली. आयुष सिंगशिवाय अखिल चौधरी, हर्ष त्यागी, दिग्वेश राठी, मयंक रावत यांनी गोलंदाजी केली. यानंतर आयुष बधोनी विकेटकीपिंग सोडून स्वत: गोलंदाजीला आला. याशिवाय आर्यन राणा, हिम्मत सिंग, प्रियांश आर्य, यश धुल आणि अनुज रावत यांनीही गोलंदाजी केली.