महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

अफगाणिस्तान बनला आशियाचा नवा 'चॅम्पियन', फायनलमध्ये श्रीलंकेला हरवून रचला इतिहास

अफगाणिस्तान क्रिकेट संघानं इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानच्या अ संघानं ACC इमर्जिंग आशिया चषकाचं विजेतेपद पटकावलं आहे.

Afghanistan Champion
अफगाणिस्तान क्रिकेट संघ (Screenshot from ACB X Handle)

By ETV Bharat Sports Team

Published : 5 hours ago

अल अमिरात (ओमान) Afghanistan Champion : अफगाणिस्तान क्रिकेट संघानं इतिहास रचला आहे. हे यश वरिष्ठ संघानं नाही तर त्यांच्या अ संघानं मिळवलं आहे. अफगाणिस्तानच्या अ संघानं ACC इमर्जिंग आशिया चषकाचं विजेतेपद पटकावलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी प्रथमच हे विजेतेपद पटकावलं आहे. अफगाणिस्ताननं अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या अ संघाचा 7 गडी राखून पराभव केला. अफगाणिस्ताननं उपांत्य फेरीत भारत अ संघाचाही पराभव केला होता. तर श्रीलंका अ संघानं पाकिस्तान अ संघाचा उपांत्य फेरीत पराभव केला होता.

2013 मध्ये भारतानं जिंकलं होतं चषक : यापुर्वी 2023 मध्ये पाकिस्तान संघानं विजेतेपद पटकावलं होते. तेव्हा भारतीय अ संघ उपविजेता ठरला. तर भारतीय संघानं 2013 चं विजेतेपद पटकावलं होते. याशिवाय 2017 आणि 2018 चे विजेतेपद श्रीलंकेनं पटकावलं आहे.

अवघ्या 18.1 षटकांत जिंकला अंतिम सामना : या अंतिम सामन्यात अफगाणिस्तान अ संघासमोर 134 धावांचं लक्ष्य होतं. संघानं 3 गडी गमावून अवघ्या 18.1 षटकांत हे लक्ष्य गाठलं. अफगाणिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला तो सेदिकुल्लाह अटल, त्यानं 55 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 55 धावा केल्या. सेदिकुल्लाह अटल हा एकमेव फलंदाज आहे, ज्यानं या स्पर्धेत सलग 5 सामन्यांमध्ये 50 हून अधिक धावा केल्या आहेत. अफगाणिस्तान अ संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. जुबैद अकबरी खातं न उघडताच बाद झाला. मात्र, यानंतर संघाचा कर्णधार दरवीश रसूली क्रीजवर आला. अटलच्या साथीनं त्यानं संघाची धावसंख्या 43 धावांपर्यंत नेली, मात्र त्यानंतर 24 धावांवर हेमंतानं त्याला बाद केलं. यानंतर करीम जनतनं कमाल दाखवत 3 षटकार मारत 27 चेंडूत 33 धावा केल्या. मात्र, इशान मलिंगानं त्याला बाद केलं. सेदिकुल्लाह दुसऱ्या टोकावर उभा होता.

श्रीलंकेची फलंदाजी अपयशी : या सामन्यात श्रीलंका अ संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून एकूण 133 धावा केल्या. श्रीलंका अ संघाची शीर्ष फळी पूर्णपणे विस्कळीत झाली आणि संघानं 15 धावांत 4 विकेट गमावल्या. मात्र पवन रत्नायके, सहान आर्चिगे, निमेश विमुक्ती यांच्या 20, 64 आणि 23 धावांच्या जोरावर संघाला 133 धावा करता आल्या. अफगाणिस्तानकडून अल्लाह मोहम्मद गझनफरनं 2 आणि बिलाल सामीनं 3 बळी घेतले.

हेही वाचा :

  1. पाकिस्ताननं इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकल्यावर कर्णधाराशिवाय केली चार संघांची घोषणा
  2. '12th फेल' चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या मुलाचा रणजी ट्रॉफीत कहर... झळकावलं सलग दुसरं द्विशतक, भारतीय संघात स्थान मिळणार?

ABOUT THE AUTHOR

...view details