ॲडलेड AUS vs IND 2nd Test :ॲडलेड ओव्हलवर खेळल्या जात असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पिंक बॉल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हिस हेडच्या बॅटने यजमान कांगारू संघाची स्थिती चांगलीच भक्कम झाली असताना, दोघांमध्ये मैदानावर जोरदार वादावादी झाली. 140 धावा करुन सिराजच्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या ट्रॅव्हिस हेडची बाद झाल्यानंतर सिराजशी बाचाबाची झाली. हेडच्या 140 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघानं भारतीय संघाच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या तुलनेत या सामन्यात 157 धावांची आघाडी घेतली.
आऊट होताना हेडनं सिराजला काहीतरी सांगितलं : आपल्या घरच्या मैदानावर ॲडलेड ओव्हलवर खेळत असलेला ट्रॅव्हिस हेड दुसऱ्या दिवसाच्या खेळात फलंदाजीला आला तेव्हा सुरुवातीपासूनच अतिशय सकारात्मक खेळ करत होता, त्यात त्यानं खराब चेंडूंविरुद्ध धावा करण्याची एकही संधी सोडली नाही. प्रथम त्याला मार्नस लॅबुशेनची साथ मिळाली, ज्याच्या बाद झाल्यानंतर, हेडनं एका टोकाकडून वेगानं धावा काढणं सुरुच ठेवलं आणि कसोटी क्रिकेटमधील त्याचं 8 वं शतक पूर्ण केलं.
जोरदार बाचाबाची : ट्रॅव्हिस हेडची आक्रमक फलंदाजी भारताच्या गोलंदाजांसाठी सतत डोकेदुखी ठरत होती, ज्यामध्ये सिराजच्या गोलंदाजीवर त्याचा विश्वास बसत नव्हता. यानंतर सरांनी लगेच सिराजला काहीतरी सांगितलं, ज्याला उत्तर देण्यात सिराजनंही वेळ न दवडता त्याला हातानं बाहेर जाण्यास सांगितलं. नंतर मैदानावरील पंचांनीही या दोघांमधील बाचाबाचीबाबत सिराजशी चर्चा केली.
सिराज आणि बुमराहनं घेतल्या 4-4 विकेट : गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात, ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 337 धावांपर्यंत मर्यादित राहिला, ज्यात भारतीय संघाच्या पहिल्या डावातील 180 धावांच्या तुलनेत त्यांना 157 धावांची मोठी आघाडीही मिळाली. भारताच्या गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 4, नितीश रेड्डी आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
हेही वाचा :
- 'डे-नाईट' कसोटीत कांगारुच्या फलंदाजानं ठोकलं वेगवान शतक, मोडला स्वतःचा विक्रम
- 'पिंक बॉल' कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताची दमदार सुरुवात, गोलंदाज कांगारुंवर वर्चस्व गाजवणार? 'इथं' पाहा लाईव्ह सामना