महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Exclusive : अफगाणिस्तानचा हा विजय निश्चितच होता; कांगारुंच्या पराभवावर काय म्हणाले अफगाण संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत? - T20 WORLD CUP 2024 - T20 WORLD CUP 2024

Lalchand Rajput Exclusive : रशीद खानच्या नेतृत्वाखालील संघानं सध्या सुरु असलेल्या टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकणं आश्चर्यकारक नाही, असं संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांना वाटतं. राजपूत यांनी ईटीव्ही भारतचे निखिल बापट यांच्याशी खास बातचीत केली.

Lalchand Rajput Exclusive
माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 9:34 PM IST

हैदराबाद Lalchand Rajput Exclusive : अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय हा देशाच्या खेळाडूंना खेळासाठी प्रेरित करेल आणि तो अपेक्षेप्रमाणेच होता, असं मत अफगाणिस्तानचे माजी मुख्य प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी व्यक्त केलंय. रशीद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्ताननं रविवारी सकाळी टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव करुन या प्रतिष्ठित स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची आपली आशा जिवंत ठेवली आहे.

हा विजय निश्चितच होता : ईटीव्ही भारतशी खास बातचीत करताना भारताचे माजी खेळाडू आणि क्रिकेट व्यवस्थापक लालचंद राजपूत म्हणाले, 'मला आश्चर्य वाटलं नाही, ते ऑस्ट्रेलियाला हरवतील अशी आशा होती. त्यांना 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातील मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करता आलं नाही आणि हा विजय निश्चितच होता."

गट 1 पुर्णपणे खुला : झिम्बाब्वेचे माजी मुख्य प्रशिक्षक राजपूत यांना वाटतं की अनेकवेळा एकदिवसीय विश्वचषक आणि एकदा टी 20 विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानविरुद्ध नेहमीच संघर्ष करावा लागला आहे. राजपूत म्हणाले, 'ऑस्ट्रेलियाला नेहमीच अफगाणिस्तानविरुद्ध संघर्ष करावा लागला आहे. अफगाणिस्तान क्रिकेटसाठी हे चांगलं आहे की त्यांनी कसोटी खेळणाऱ्या संघाचा पराभव केला आहे, जो विश्वविजेता आहे. या विजयामुळं त्यांना खूप आत्मविश्वास मिळेल." तसंच अफगाणिस्तानच्या विजयानं टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील गट 1 पुर्णपणे खुला केला आहे. आता भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान अंतिम टप्प्यासाठी पात्र ठरु शकतात.

रशीद खानचं केलं कौतूक : राजपूत यांनी अफगाणिस्तानचा कर्णधार राशीद खानचंही कौतुक केलं आणि त्याला एक चांगला कर्णधार म्हणून वर्णन केलं. ते म्हणाले, "रशीद खान हा खूप चांगला क्रिकेटर आहे आणि त्याच्याकडे क्रिकेटिंग डावपेच चांगले आहे. तो खूप चांगला कर्णधार आहे. कारण तो आयपीएल आणि जगभरातील लीगमध्ये खेळत आहे. त्यामुळं त्याला खेळाचं चांगलं ज्ञान आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो खूप चांगले निर्णय घेतो. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना बघितला तर त्यानं गुलाबुद्दीनला योग्य वेळी गोलंदाजी दिली. कोणत्या फलंदाजावर प्रतिआक्रमण करायचे हे त्याला माहीत आहे. त्यानं नेतृत्व करत कर्णधारपदाचं कौशल्यही दाखवलं."

या विजयामुळं अफगाणिस्तानच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल : अफगाणिस्तानच्या लोकांना क्रिकेटची खूप आवड असल्यानं या विजयामुळं त्यांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास अनुभवी प्रशिक्षक राजपूत यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, "भारताप्रमाणेच त्यांचं खेळाडूंवर प्रेम आहे. तुम्ही अफगाणिस्तानकडं बघितलं तर ते जिथं खेळतात तिथं तुम्हाला अफगाणिस्तानचे चाहते त्यांना साथ देताना दिसतील. या विजयामुळं त्यांच्या खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळेल." तसंच अफगाणिस्तानचे माजी फलंदाजी प्रशिक्षक उमेश पटवाल यांनाही ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय आश्चर्यकारक वाटला नाही.

हेही वाचा :

  1. अफगाणिस्तानच्या विजयानंतर काय आहे सेमीफायनलचं समीकरण; उपांत्य फेरी गाठणं भारतासाठीही आहे कठीण - T20 World Cup 2024
  2. नाकिशच्या टायटन्सना पराभूत करत रत्नागिरीनं सलग दुसऱ्या वर्षी पटकावलं एमपीएलचं विजेतेपद - MPL 2024
  3. 'कांगारुं'कडून अफगाणिस्तानचा तीन वेळा अपमान; आता टी 20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला धूळ चारत घेतला बदला - T20 World Cup 2024

ABOUT THE AUTHOR

...view details