महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

राहुल द्रविडचं IPL मध्ये पुनरागमन... जुन्या संघाला बनवणार चॅम्पियन - IPL 2025 - IPL 2025

IPL 2025 : भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक आता आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक बनणार आहे. यासोबतच श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकाराही संघासोबत दिसणार आहे.

IPL 2025
राहुल द्रविडचं IPL मध्ये पुनरागमन (IANS Photos)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 4, 2024, 5:10 PM IST

नवी दिल्ली RR Coach in 2025 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक आणि क्रिकेटर राहुल द्रविडच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी येत आहे. प्राप्त अहवालानुसार, राजस्थान रॉयल्स आयपीएल 2025 मध्ये राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करणार आहे. यासोबतच कोहली आणि रोहितसारख्या स्टार फलंदाजांना फलंदाजीचे बारकावे शिकवणारे राहुलचा सहकारी आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांना संघाचं सहाय्यक प्रशिक्षक केलं जाऊ शकतं.

राहुल आणि विक्रम होणार राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक :राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक आणि विक्रम सहाय्यक प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे. यासोबतच श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक फलंदाज आणि कर्णधार कुमार संगकारा राजस्थान रॉयल्स संघाचा क्रिकेट संचालक होणार आहे. आता आयपीएल 2025 मध्ये ही तीन जोडी काय जादू दाखवतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय क्रिकेट संघानं अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या टी 20 विश्वचषक 2024 चं विजेतेपद पटकावलं होतं.

राहुलच्या मार्गदर्शनाखली संघाची कामगिरी कशी : राहुलनं 2022 च्या टी 20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाला उपांत्य फेरीत नेलं होतं. तर भारतीय संघानं 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना राहुलच्याच मार्गदर्शनाखाली मायदेशात खेळला होता. यात संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता.

संजू आणि राहुल जोडीकडून राजस्थानला विजेतेपदाची अपेक्षा : आता राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. संजू सॅमसन आयपीएलमध्ये राजस्थान संघाचं नेतृत्व करताना दिसणारा आहे. सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थाननं गेल्या काही आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत अव्वल 4 संघांमध्ये स्थान मिळवलं, पण विजेतेपदापासून ते हुकले. आता राहुल आणि संजू या जोडीची आयपीएल जिंकण्यावर नजर असेल.

हेही वाचा :

  1. नाशिकच्या 'साहिल'ची भारतीय क्रिकेट संघात निवड; 'रोहित'सह दाखवणार 'जलवा' - Sahil Parakh
  2. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पोटनिडणुकीत सचिन तेंडुलकरला मोठा धक्का - sachin tendulkar

ABOUT THE AUTHOR

...view details