महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

T20 विश्वचषकानंतर साहेबांचा संघ पहिल्यांदाच उतरणार मैदानात, विजयी सुरुवात करणार? पहिला सामना 'इथं' पाहा लाईव्ह

दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट संघात तीन सामन्यांची T20 मालिका आजपासून सुरु होत आहे. T20 विश्वचषकानंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

ENGW vs SAW 1st T20I Live Streaming
इंग्लंड महिला क्रिकेट संघ (Getty Images)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 24, 2024, 12:42 PM IST

लंडन ENGW vs SAW 1st T20I Live Streaming : दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला T20 आज म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पूर्व लंडनमधील बफेलो पार्क इथं होणार आहे.

T20 विश्वचषकानंतर पहिलीच मालिका : T20 विश्वचषक संपल्यानंतर आगामी मालिका दोन्ही संघांसाठी पहिली असेल. आफ्रिकेचा संघ सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषकात उपविजेता ठरला आणि अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाला. तर इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजकडून गटातील शेवटचा सामना गमावल्यानंतर बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरला आणि दुसरं T20 विश्वविजेतेपद जिंकण्याचे त्यांचं स्वप्न भंगलं. मात्र, या मालिकेत दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

दोन्ही संघात दिग्गज खेळाडूंचा समावेश : T20 मालिकेतील दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाची कमान लॉरा वोल्वार्डच्या खांद्यावर असेल. याखेरीज अनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लर्क, स्युने लुस आणि नॉनकुलुलेको म्लाबा यांच्यासह अनेक अनुभवी खेळाडू संघाचा भाग आहेत. दुसरीकडे इंग्लंडची कमान हेदर नाइटच्या हाती आहे. याशिवाय टॅमी ब्युमाँट, लॉरेन बेल, माईया बाउचियर, ॲलिस कॅप्सी, केट क्रॉस, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन यांच्यासह अनेक स्टार खेळाडू संघाचा भाग आहेत.

दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : दक्षिण आफ्रिका महिला आणि इंग्लंड महिला संघांची आतापर्यंत 25 वेळा आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. ज्यात इंग्लंडचा वरचष्मा दिसत आहे. इंग्लंडनं 25 पैकी 20 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेनं केवळ 4 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला. यावरुन इंग्लंड बलाढ्य असल्याचं दिसून येतं. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला घरच्या मैदानावर विजयासाठी चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

दक्षिण आफ्रिका महिला आणि इंग्लंड महिला यांच्यातील T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज :

दक्षिण आफ्रिका महिला आणि इंग्लंड महिला यांच्यातील कसोटीत इंग्लंडच्या शार्लोट मेरी एडवर्ड्सनं सर्वाधिक धावा केल्या आहेत. शार्लोट मेरी एडवर्ड्सनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 15 सामन्यांच्या 15 डावात 54.10 च्या सरासरीनं 541 धावा केल्या आहेत. यात, शार्लोट मेरी एडवर्ड्सनं 4 अर्धशतकं केली आहेत आणि 76* धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.

दक्षिण आफ्रिका महिला आणि इंग्लंड महिला यांच्यातील T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज :

दक्षिण आफ्रिका महिला आणि इंग्लंड महिला यांच्यातील T20 सामन्यात इंग्लंडच्या अन्या श्रबसोलेनं सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. अन्या श्रबसोलेनं इंग्लंडविरुद्ध 13 सामन्यांच्या 13 डावांत 14.00 च्या सरासरीनं आणि 5.60 च्या इकॉनॉमीनं 19 बळी घेतले आहेत.

दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध इंग्लंड महिला यांच्यातील पहिला T20 सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?

दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध इंग्लंड महिला यांच्यातील पहिला T20 सामना आज, रविवार 24 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता बफेलो पार्क, पूर्व लंडन इथं खेळवला जाईल. तर नाणेफेकीची वेळ या आधी अर्धा तास असेल.

दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध इंग्लंड महिला यांच्यातील पहिला T20 सामना कुठं आणि कसा पाहायचा?

सध्या भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध इंग्लंड महिला यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेच्या प्रसारणाबाबत कोणतीही माहिती नाही. तथापि, महिला T20 मालिकेचं लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना इथून पहिल्या T20 सामन्याचा आनंद घेता येईल.

मालिकेसाठी दोन्ही संघ :

दक्षिण आफ्रिका : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिचेस, नदिन डी क्लार्क, ॲने डेर्कसेन, अयांडा हलुबी, सिनालोआ जाफ्ता, सुने लुस, एलिस-मेरी मार्क्स, नॉनकुलुलेको म्लाबा, तुमी सेखुम्सोने, नोंदुमिसो शंगासे, क्लो ट्रायॉन, फेय ट्यूनीक्लिफ.

इंग्लंड : हीदर नाइट (कर्णधार), लॉरेन बेल, माइया बौचियर, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फाइलर, सारा ग्लेन, बेस हीथ, एमी जोन्स, फ्रेया केम्प, पायगे स्कोफिल्ड, नॅट स्किव्हर-ब्रंट स्मिथ, डॅनी व्याट-कॅमेरा

हेही वाचा :

  1. कांगारुंना त्यांच्या घरात पराभूत केल्यानंतर पाकिस्तान झिम्बाब्वेलाही हरवणार? ऐतिहासिक सामना 'इथं' पाहा लाईव्ह
  2. 0,0,0,0,0,0,0...शुन्यावर आउट झाले 18 फलंदाज; क्रिकेटच्या इतिहासातील पहिलीच वेळ

ABOUT THE AUTHOR

...view details