लंडन England vs Australia 4th ODI Live Streaming : इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आज 26 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधला हा सामना लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.
तिसऱ्या वनडेत काय झालं : इंग्लंडनं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दमदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा 46 धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत 304 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडनं 37.4 षटकांत 4 विकेट गमावून 254 धावा केल्या होत्या. मात्र, यानंतर पावसानं सामना विस्कळीत केला आणि डीएलएस समीकरणाच्या आधारे इंग्लंड 46 धावांनी पुढं होता. यानंतर आता चौथा सामना जिंकून यजमान संघ मालिकेत 2-2 अशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघ मालिकेवर कब्जा करण्याच्या इराद्यानं उतरणार आहे. सध्या पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया 2-1 नं आघाडीवर आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्ड : एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आतापर्यंत 158 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात ऑस्ट्रेलियानं 90 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडनं 63 सामने जिंकले आहेत. यात दोन सामने टाय झाले असून तीन सामन्यांचा निकाल लागलेला नाही. इंग्लंडच्या भूमीवर दोन्ही संघांमध्ये 75 सामने खेळले गेले आहेत. यात ऑस्ट्रेलिया संघानं 35 सामने जिंकले असून इंग्लंडनं 36 सामने जिंकले आहेत. तर 2 सामने टाय झाले असून दोन सामन्यांचा निकाल लागला नाही.
वनडे मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला वनडे : 19 सप्टेंबर 2024, ट्रेंट ब्रिज, (ऑस्ट्रेलिया 7 विकेटनं विजयी)
- दुसरा वनडे : 21 सप्टेंबर 2024, हेडिंग्ले लीड्स, (ऑस्ट्रेलिया 68 धावांनी विजयी)
- तिसरा वनडे : 24 सप्टेंबर, सीट युनिक रिव्हरसाइड, चेस्टर-ली-स्ट्रीट, (इंग्लंड 46 धावांनी विजयी)
- चौथा वनडे : आज, लॉर्ड्स, सायंकाळी 5 वाजता
- पाचवा वनडे : 29 सप्टेंबर 2024, सीट युनिक स्टेडियम दुपारी 3:30 वाजता
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा वनडे सामना कधी खेळला जाईल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा वनडे सामना शुक्रवार 27 सप्टेंबर रोजी होणार आहे.
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा वनडे सामना कुठं खेळवला जाईल?