लीड्स England vs Australia 2nd ODI Live Streaming : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (21 सप्टेंबर 2024) होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं स्फोटक खेळी करत इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 49.4 षटकांत सर्वबाद 315 धावा केल्या. इंग्लंडकडून बेन डकेटनं 104.39 च्या स्ट्राईक रेटनं 91 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीनं 95 धावा केल्या. मात्र, त्याचं शतक हुकलं. त्याचवेळी विक जॅकनंही अर्धशतक झळकावलं. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघानं 44 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठलं. कांगारुंकडून ट्रॅव्हिस हेडनं सर्वात मोठी खेळी खेळली. त्यानं 129 चेंडूंचा सामना करत 20 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 154 धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला.
दुसरा सामना ठरणार निर्णायक : आता दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघांमधील सामना खूपच रोमांचक होणार आहे, कारण इंग्लंडचा संघ हा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल, तर ऑस्ट्रेलियन संघ हा सामना जिंकून मालिकेत आघाडी मजबूत करण्यासाठी मैदानात उतरेल. तसंच या मालिकेत दुखापतीमुळं इंग्लंडचा नियमित कर्णधार जॉस बटलर बाहेर झाला आहे. त्याच्या अनुपस्थितीत युवा हॅरी ब्रूककडं संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जो पहिल्यांदाच संघाचं नेतृत्व करत आहे.
वनडे मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला वनडे : 19 सप्टेंबर 2024, ट्रेंट ब्रिज, (ऑस्ट्रेलिया 7 विकेटनं विजयी)
- दुसरा वनडे : आज हेडिंग्ले, दुपारी 3:30 वाजता
- तिसरा वनडे : 24 सप्टेंबर 2024, सीट युनिक रिव्हरसाइड, सायंकाळी 5 वाजता
- चौथा वनडे : 27 सप्टेंबर 2024, लॉर्ड्स, सायंकाळी 5
- पाचवा वनडे : 29 सप्टेंबर 2024, सीट युनिक स्टेडियम दुपारी 3:30 वाजता
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना कधी खेळला जाईल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना शनिवार 21 सप्टेंबर रोजी होणार आहे.
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना कुठं खेळवला जाईल?
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना किती वाजता सुरु होईल?