महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मैदानासोबत तुरुंगाची हवा खाणारे जगातील दिग्गज क्रिकेटपटू; 2011 च्या भारतीय विश्वविजेत्या संघातील दिग्गज खेळाडूचा समावेश - Cricketers Went to Jail - CRICKETERS WENT TO JAIL

Cricketers Went to Jail : जगभरात असे अनेक दिग्गज क्रिकेटपटू आहेत जे कोणत्या ना कोणत्या प्रकरणात तुरुंगात जाऊन आले आहेत. या यादीत किती भारतीय खेळाडूंचा समावेश आहे? जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी.

Cricketers Went to Jail
तुरुंगाची हवा खाणारे जगातील दिग्गज क्रिकेटपटू (Getty Images)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 14, 2024, 7:00 PM IST

नवी दिल्ली Cricketers Went to Jail : क्रिकेटच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन केल्यामुळं किंवा मैदानाबाहेर इतर कोणत्याही बाबीमुळं तुरुंगवास भोगलेले अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत. या बातमीत आम्ही अशाच काही खेळाडूंबद्दल सांगणार आहोत जे कोणत्या ना कोणत्या प्रकरणात तुरुंगात गेले आहेत.

  • इम्रान खान (पाकिस्तान)

मे 2023 मध्ये, माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेत असताना महागड्या सरकारी भेटवस्तू विकून नफा कमावल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यात त्यांना 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 वर्ष सक्रिय राजकारणात भाग घेण्यास बंदी घालण्यात आली होती.

इम्रान खान (ANI Photo)
  • शहादत हुसेन (बांगलादेश)

फरार बांगलादेशी क्रिकेटपटू शहादत हुसैन यालाही तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. त्याच्यावर एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचं शारीरिक शोषण केल्याचा आरोप होता, जिला तो बेकायदेशीरपणे आपल्या घरात मोलकरीण म्हणून ठेवत होता.

शहादत हुसेन (AFP Photo)
  • एस श्रीशांत (भारत)

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत आयपीएल 2013 दरम्यान सट्टेबाजांशी संबंध असल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आणि बीसीसीआयनं त्याच्यावर आजीवन बंदी घातली. योग्य पुराव्याअभावी सुटका होण्यापूर्वी त्याला जवळपास महिनाभर तिहार तुरुंगात काढावं लागलं. विशेष म्हणजे एस श्रीशांत हा 2011 च्या भारताच्या विश्वविजेत्या संघाचा सदस्य होता.

एस श्रीशांत (AFP Photo)
  • बेन स्टोक्स (इंग्लंड)

इंग्लंड कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्सला ॲलेक्स हेल्ससोबत ब्रिस्टलमध्ये रात्र घालवल्यानंतर तुरुंगात टाकण्यात आलं. दोघंही रात्रभर कारागृहात राहिले आणि दुसऱ्या दिवशी न्यायालयाला सुट्टी होती. रस्त्यावरील कॅमेऱ्यात व्हिडिओ फुटेज कैद झालं होतं, ज्यामध्ये स्टोक्स एका मुलाला मुक्का मारताना दिसला होता.

बेन स्टोक्स (ANI Photo)
  • मोहम्मद आमिर (पाकिस्तान)

मोहम्मद अमीरनं 2010 मध्ये लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या कसोटीत स्पॉट फिक्सिंग केलं होतं. या प्रकरणी आमिरवर सर्व क्रिकेटमधून 5 वर्षांची बंदी घालण्यात आली होती आणि 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर तो 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला.

मोहम्मद आमिर (IANS Photo)
  • नवज्योत सिंग सिद्धू (भारत)

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना 19 मे 2022 रोजी 34 वर्षे जुन्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. परिणामी त्यांनी एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा भोगली आहे.

नवज्योत सिंग सिद्धू (ANI Photo)
  • ख्रिस लुईस (इंग्लंड)

मे 2009 मध्ये, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ख्रिस लुईसला त्याच्या क्रिकेट बॅगमध्ये फळांच्या रसाच्या बॉक्समध्ये लपवून 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या द्रव कोकेनची ब्रिटनमध्ये तस्करी केल्याबद्दल 13 वर्षांचा तुरुंगवास झाला होता.

ख्रिस लुईस (AFP Photo)
  • मोहम्मद आसिफ आणि सलमान बट (पाकिस्तान)

क्रिकेट जगताला हादरवणारा हा सर्वात मोठा मॅच फिक्सिंगचा कट मानला जातो. 2010 मध्ये पाकिस्तानी कर्णधार सलमान बटनं मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद अमीरला वारंवार गोलंदाजी करण्यास भाग पाडलं. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपात बट आणि आसिफ यांना अनुक्रमे 10 आणि 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

मोहम्मद आसिफ आणि सलमान बट (AFP Photo)
  • दानुष्का गुनाथिलका (श्रीलंका)

ICC T20 विश्वचषक 2022 दरम्यान सिडनी इथं लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर श्रीलंकेचा फलंदाज दनुष्का गुनाथिलका यानं ऑस्ट्रेलियात 11 दिवस तुरुंगात घालवले होते.

दानुष्का गुनाथिलका (AFP Photo)
  • रुबेल हुसेन (बांगलादेश)

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसैनलाही या यादीत आहे. रुबेलवर त्याची दीर्घकाळापासूनची मैत्रीण असलेल्या एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला होता. महिलेनं सांगितलं की, क्रिकेटरनं तिच्याशी लग्न करण्याचं वचन मोडलं आणि तिच्यावर अत्याचार केला. तक्रारीनंतर बांगलादेश पोलिसांनी गोलंदाजाला तुरुंगात टाकलं होतं.

रुबेल हुसेन (ANI Photo)

हेही वाचा :

  1. वनडे विश्वचषकाच्या आयोजनानं भारताला मोठा फायदा, कमावले 116370000000 रुपये - World Cup Impact on Indian Economy

ABOUT THE AUTHOR

...view details