मुंबई Brendon McCullum :बॅझबॉल क्रिकेटचा जनक, न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम आज 43 वर्षांचा झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीनं एक वेगळी ओळख निर्माण करणारा मॅक्युलम सध्या इंग्लंड कसोटी आणि वनडे संघाचा प्रशिक्षक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर मॅक्क्युलमनं प्रशिक्षक म्हणून नवी इनिंग सुरू केली आणि लवकरच जगातील सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून त्यांची गणना होऊ लागली.
कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद शतक, इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात शतक आणि कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकण्याचे विक्रम ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या काही रंजक रेकॉर्ड्सबद्दल सांगणार आहोत.
न्यूझीलंडकडून T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू : ब्रेंडन मॅक्क्युलम हा न्यूझीलंडचा T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. T20 क्रिकेटमध्ये मॅक्युलमनं 136.49 च्या स्ट्राइक रेटनं 9,922 धावा केल्या आहेत. मॅक्युलमच्या नावावर या फॉरमॅटमध्ये 7 शतकं आणि 55 अर्धशतकं आहेत. मॅक्युलमच्या नावावर आयपीएलमध्येही दोन शतकं आहेत.
मॅक्युलमचे काही मोठे विक्रम : कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर आहे. या फॉरमॅटमध्ये त्यानं 107 षटकार मारले आहेत. तसंच सलग 100 हून अधिक कसोटी सामने खेळणाऱ्या (101) जगातील पाच क्रिकेटपटूंपैकी मॅक्युलम एक आहे. याशिवाय सलग 122 वनडे सामने खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.