वेलिंग्टन Playing 11 Announced : इंग्लंड क्रिकेट संघाला 6 डिसेंबरपासून वेलिंग्टन मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळायचा आहे. या सामन्यासाठी इंग्लंड संघानं दोन दिवस आधीच आपल्या प्लेइंग 11 घोषणा केली आहे. इंग्लंडनं मालिकेतील पहिला सामना 8 विकेटनं जिंकला होता.
संघात काय बदल : इंग्लंड क्रिकेट संघ सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे, ज्यामध्ये त्यांनी क्राइस्टचर्च इथं खेळलेला पहिला सामना 8 गडी राखून जिंकला. आता या मालिकेतील दुसरा सामना वेलिंग्टनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे, ज्यासाठी इंग्लंडनं आपल्या प्लेइंग 11 ची केली आहे. या सामन्यासाठी, इंग्लंड संघानं आपल्या प्लेइंग 11 बाबत मोठा निर्णय घेतला आहे, या सामन्यातही ऑली पोप यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे, तर जेकब बेथेलला पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळणार आहे.
बेथेलची दुसऱ्या डावात आक्रमक खेळी :क्राइस्टचर्च कसोटी सामन्यात जेकब बेथेलला इंग्लंड संघाच्या प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं तेव्हा सर्वांनाच वाटलं की त्याच्याबाबतचा निर्णय लवकर घेतला गेला नाही. या 21 वर्षीय खेळाडूला पहिल्या डावात 34 चेंडूंचा सामना केल्यानंतर केवळ 10 धावा करण्यात यश आलं. पण यानंतर त्यानं दुसऱ्या डावात आपल्या प्रतिभेची सर्वांना ओळख करून दिली आणि अवघ्या 37 चेंडूत विक्रमी अर्धशतक झळकावून इंग्लंडला सामना जिंकून दिला.