नवी दिल्लीDattajirao Gaikwad passed away : भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड यांचं मंगळवारी बडोदा येथील राहत्या घरी निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. गायकवाड यांची कसोटी कारकीर्द 1952 ते 1961 पर्यंत होती. या काळात त्यांनी केवळ 11 कसोटी समाने खेळले आहेत. या त्यांनी 350 धावा केल्या होत्या. 1959 मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचं त्यांनी कर्णधारपद भूषवलं होतं. परंतु तेव्हा संघानं पाचही कसोटी समाने गमावले होते.
बडोदा क्रिकेट संघाचे कर्णधार :1959 मध्ये नवी दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध 52 धावा ही गायकवाडांची सर्वोच्च धावसंख्या होती. रणजी ट्रॉफीमध्ये दत्ताजीराव गायकवाड 1957-58 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये बडोदा क्रिकेट संघाचे कर्णधार होते. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बडोदा येथील मोतीबाग स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात बडोदा संघानं सर्व्हिसेस संघाचा एक डावासह 51 धावांनी पराभव केला होता. रणजीमध्ये गायकवाडांनी 14 शतकांसह 3 हजार 139 धावा केल्या होत्या. 1959-60 मध्ये महाराष्ट्राविरुद्ध नाबाद 249 धावा ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. गायकवाड यांनी आणखी दोन द्विशतकंही केली आहेत. 1949-50 मध्ये गुजरातविरुद्ध त्यांनी नाबाद 128 तसंच 101 धावा केल्या होत्या.