बेनोनी (दक्षिण आफ्रिका) History in T20I Cricket : T20I क्रिकेटमध्ये दररोज अधिकाधिक विक्रम होतात आणि मोडले जातात. अनेक वेळा खेळाडू असे रेकॉर्ड बनवतात जे केवळ खेळाडूसाठीच नाही तर संपूर्ण संघासाठी खूप महत्त्वाचे असतात. असाच काहीसा विक्रम 27 नोव्हेंबरला झालेल्या T20 सामन्यात पाहायला मिळाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात सामना झाला ज्यात एका खेळाडूनं असा विक्रम केला जो आजच्या आधी त्या संघाला करता आला नव्हता.
विक्रमी धावा करणारी पहिलीच क्रिकेटपटू : वास्तविक, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची T20I मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडनं जिंकला होता. यानंतर दुसरा सामना विलोमूर पार्क, बेनोनी इथं झाला. यात प्रथम फलंदाजी करताना डॅनियल व्याट-हॉज आणि नेट सायव्हर-ब्रंट यांनी अप्रतिम खेळी खेळली. अशाप्रकारे इंग्लंडनं आपल्या 20 षटकांत 4 गडी गमावून 204 धावांची मोठी धावसंख्या उभारली. यादरम्यान डॅनियल व्याट-हॉजनं अवघ्या 45 चेंडूंत 15 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 78 धावांची खेळी केली. या खेळीमुळं डॅनी व्याटनं T20I क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी नवा इतिहास रचला. T20I क्रिकेटमध्ये 3000 धावा करणारी डॅनी व्याट ही इंग्लंडची पहिलीच खेळाडू ठरली. इतकंच नाही तर ती इंग्लंडची दुसरी महिला क्रिकेटपटू आहे, जिनं क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 3000 धावा करण्याचा मोठा पराक्रम केला आहे.