महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

AUS vs IND 2nd Test: दिग्गज खेळाडू दुसऱ्या कसोटीपूर्वी जखमी, संघात दोन नव्या खेळाडूंना स्थान - INDIA VS AUSTRALIA 2ND TEST

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात दोन गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी एकाही खेळाडूनं अद्याप ऑस्ट्रेलियाकडून कोणत्याही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही.

India vs Australia 2nd Test
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 30, 2024, 12:59 PM IST

ॲडलेड India vs Australia 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा दुसरा सामना 6 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना असेल, जो ॲडलेड ओव्हल इथं खेळवला जाईल. मात्र दुखापतीमुळं ऑस्ट्रेलियन दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड बाहेर असून त्याच्या जागी शॉन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेटला ऑस्ट्रेलियन कसोटी संघात संधी मिळाली आहे. ॲबॉट याआधी ऑस्ट्रेलियाकडून वनडे आणि T20 खेळला आहे, परंतु, डॉगेटनं अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही.

शॉन ऍबॉट :32 वर्षीय शॉन ॲबॉटनं ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत 26 वनडे सामन्यांमध्ये एकूण 29 विकेट घेतल्या आहेत. त्यानं 20 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये एकूण 26 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड चांगला आहे, ज्यात त्याच्या नावावर 261 प्रथम श्रेणी विकेट आहेत. त्याला अद्याप कसोटी पदार्पणाची संधी मिळाली नसली तरी वनडे आणि T20 मध्ये छाप पाडण्यात तो यशस्वी ठरला आहे. तो आयपीएलमध्ये आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबादकडूनही खेळला आहे.

फिलिप ह्यूजशी आहे संबंध : 2014 मध्ये, ऑस्ट्रेलियाचा आश्वासक क्रिकेटपटू फिलिप ह्यूजचा शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील सामन्यादरम्यान चेंडू लागून मृत्यू झाला होता. तेव्हा शॉन ॲबॉट गोलंदाजी करत होता. त्याचा चेंडू ह्यूजच्या मानेच्या खालच्या भागात लागला, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. जिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

ब्रेंडन डॉगेट : ब्रेंडन डॉगेटचा दुसऱ्यांदा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. याआधी 2018 मध्ये तो पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी यूएईला गेला होता. 32 वर्षीय डॉगेटनं आतापर्यंत 40 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण 142 विकेट घेतल्या आहेत. या यादीत त्याच्या नावावर 23 विकेट्स आहेत.

प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं कठीण : दुसऱ्या कसोटीसाठी ब्रेंडन डॉगेट आणि शॉन ॲबॉट यांचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला असला तरी या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये सधी मिळणं कठीण आहे. कारण ऑस्ट्रेलियाकडं आधीच स्कॉट बोलँड आहे. मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचं नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याला साथ देण्यासाठी कर्णधार पॅट कमिन्स संघात उपस्थित आहे.

हेही वाचा :

  1. श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामना सुरु असताना दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना अटक, क्रिकेट विश्वात खळबळ
  2. केन 'कन्सिस्टंट' विल्यमसन... इंग्रजांविरुद्ध महापराक्रम करत रचला इतिहास
  3. 9 षटकार, 23 चेंडूत 77 धावा... 'मुंबई'च्या माजी फलंदाजानं अवघ्या 27 चेंडूत लावला सामन्याचा 'निकाल'

ABOUT THE AUTHOR

...view details