नवी दिल्ली Boxer Mary Kom : भारतीय बॉक्सर मेरी कोमच्या निवृत्तीची बातमी बुधवारी रात्री वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. यानंतर आता 6 वेळा विश्वविजेती मेरी कोमनं खेळातून निवृत्तीच्या वृत्ताचं खंडन केलंय. आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून सध्या निवृत्त होण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचं तिनं म्हटलंय.
मेरी कोमनं केलं निवृत्तीच्या बातम्यांच खंडन : लंडन ऑलिम्पिक 2012 कांस्यपदक विजेती मेरी कोमनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, "माझ्या मीडियातील मित्रांनो, मी अद्याप माझी निवृत्ती जाहीर केलेली नाही आणि माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आलाय. जेव्हा मला माझ्या निवृत्तीची घोषणा करावी लागेल तेव्हा मी स्वतः सर्वांना सांगेन."
काय म्हणाली मेरी कोम : बुधवारी दिब्रुगडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान मेरी कोमच्या निवृत्तीची बातमी पसरली होती. मेरी कोमनं वयाच्या बंधनामुळं आता ऑलिम्पिक खेळता येणार नसल्याचं सांगितलं होतं. यावर ती म्हणाली "मी काही मीडिया रिपोर्ट्स पाहिले आहेत, ज्यात मी खेळाला अलविदा केल्याचं म्हटलं होतं, जे योग्य नाही. मी 24 जानेवारीला दिब्रुगडमध्ये एका शाळेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिथं मी मुलांना चीअर करत होते. मला अजूनही खेळात नवीन उंची गाठण्याची भूक आहे पण ऑलिम्पिकमधील वयोमर्यादेमुळं मी भाग घेऊ शकत नाही." असं म्हटलं होतं.
जेव्हा निवृत्ती घेईन तेव्हा सर्वांना सांगेन : 41 वर्षीय मेरी कोमनं पुढे लिहिलं की, "जेव्हा मी निवृत्तीचा निर्णय घेईन तेव्हा सर्वांना सांगेन. इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनच्या नियमांनुसार, केवळ 40 वर्षांपर्यंतचे पुरुष आणि महिला बॉक्सर ऑलिम्पिकसारख्या उच्चस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतात."
हेही वाचा :
- आजपासून रंगणार 'फिरकी' आणि 'बॅझबॉल'मध्ये युद्ध; पहिल्या सामन्यात 'साहेब' करणार फलंदाजी
- साहेबांविरुद्ध पहिल्या दोन कसोटींसाठी कोहलीच्या जागी 'पाटीदार' खेळाडूची वर्णी; पहिल्या सामन्यात करु शकतो पदार्पण
- आयसीसी वनडे आणि कसोटी 'टीम ऑफ द इयर' जाहीर, वाचा कोणत्या भारतीयांनी मिळवलं संघात स्थान