महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

हत्येचा आरोप असलेल्या 'या' IPL दिग्गजावर बोर्ड बंदी घालणार का? वकिलांनी केली 'ही' मोठी मागणी - IPL Star in Trouble

BBC gets notice : बांगलादेशच्या स्टार अष्टपैलू खेळाडूवर मोठी कारवाई होऊ शकते. कारण त्याच्याविरुद्ध बोर्डाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण बातमी...

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 26, 2024, 7:44 PM IST

नवी दिल्ली Shakib Al Hasan : बांगलादेश क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू तसंच आयपीएल दिग्गज शाकिब अल हसनवर मोठी कारवाई होऊ शकते. शाकिबचं वादग्रस्त वर्तनही अनेक प्रसंगी मैदानावर पाहायला मिळालं आहे. त्यानं अलीकडेच पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानवर चेंडू फेकला, यावरुन त्याचा राग आणि चिडचिड दिसून येते. पण आता क्रिकबझनं दिलेल्या वृत्तानुसार, साकिब मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरुद्ध कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

शाकिबवर खुनाचा आरोप : सध्या बांगलादेशमध्ये निदर्शनं आणि हिंसाचार सुरु असताना क्रिकेटर शाकिब अल हसनवर हत्येचा आरोप आहे. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी वकिलांच्या मदतीनं बांगलादेश क्रिकेट बोर्डाला नोटीस बजावली आहे. या कायदेशीर नोटीसमध्ये वकिलांनी शाकिब अल हसनवर क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून बंदी घालण्याची मागणी केली आहे. शाकिब शेख हसीनाच्या सरकारमध्ये मंत्री होता. सध्या तो बांगलादेशसाठी पाकिस्तानमधील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण : बांगलादेशात मोठ्या प्रमाणात झालेल्या निदर्शनांमुळं पंतप्रधान शेख हसीन यांची सत्ता गेली आणि त्यांना एका रात्रीत स्वतःच्या देशातून पळून जावं लागलं. यानंतर आंदोलन आणखी तीव्र झालं, ज्यात 400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. यावेळी शाकिबसह 147 जणांवर एका विद्यार्थ्याची हत्या केल्याचा आरोप आहे. मृत विद्यार्थ्याच्या वडिलांच्या वतीनं क्रिकेटपटूविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. वास्तविक, 5 ऑगस्ट रोजी झालेल्या गोळीबारात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. आता वडिलांनी वकिलांच्या मदतीनं बांगलादेश बोर्डाला नोटीस बजावली आहे.

आयसीसीनं ठोठावला दंड : दरम्यान, बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनलाही आयसीसीनं पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानच्या दिशेनं चेंडू फेकल्याबद्दल फटकारलं आहे. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावातील 33व्या षटकात शाकिबनं चेंडू रिझवानच्या दिशेनं फेकला होता. 'शाकिबला त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड आणि आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 चं उल्लंघन केल्याबद्दल एक डिमेरिट पॉइंट ठोठावण्यात आला आहे,' असं आयसीसीनं म्हटलं आहे.

हेही वाचा :

  1. दिग्गज आयपीएल खेळाडूवर खुनाचा गुन्हा दाखल, क्रिकेटविश्वात खळबळ - murder case registered on Ipl star
  2. अरेच्चा... सामन्याचं तिकीट फक्त 15 रुपये, तरी मैदान रिकामं; अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं उचललं मोठं पाऊल - PAK vs BAN Test

ABOUT THE AUTHOR

...view details