महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

37 षटकार, 349 धावा... बडोदा संघानं लिहिलं नवं 'रेकॉर्ड बुक' - HIGHEST TOTAL IN T20 CRICKET

बडोदा क्रिकेट संघानं T20 क्रिकेटमध्ये असा विक्रम केला आहे, जो या फॉरमॅटमध्ये यापूर्वीही झाला नव्हता. संघाच्या सर्व फलंदाजांनी स्फोटक शैलीत फलंदाजी केली.

Highest Total in T20 Cricket
बडोदा क्रिकेट संघ (Social Media X)

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 5, 2024, 11:34 AM IST

Updated : Dec 5, 2024, 1:06 PM IST

इंदौर Highest Total in T20 Cricket : एक काळ असा होता की वनडे क्रिकेटमध्ये 300 धावा करणं खूप कठीण होतं. संघाच्या 250 च्या जवळ गेल्यावरही सामने जिंकले जायचे. पण तेव्हापासून काळ खूप बदलला आहे. आता वनडे सोडा, T20 मध्ये सुद्धा 300 पेक्षा जास्त स्कोअर होऊ लागला आहे. दरम्यान, बडोदा क्रिकेट संघानं मैदानावर अशी कामगिरी केली आहे, जी यापूर्वी T20 क्रिकेटच्या इतिहासात कधीही घडली नव्हती. बडोद्यानं T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. हा स्वतःच एक विक्रम आहे. एवढंच नाही तर बडोदा संघानं या सामन्यात अनेक नवे विक्रम केले आहेत.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बडोदा विरुद्ध सिक्कीम सामना : सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत गुरुवारी बडोदा आणि सिक्कीमचे संघ आमनेसामने होते. बडोदा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला तेव्हा आज एक मोठा विक्रम होणार आहे याचा अंदाज कोणालाच आला नसेल. बडोदा संघ येताच चौकार आणि षटकारांचा एवढा पाऊस पडला की काहीतरी मोठं घडणार, असं वाटू लागले. बडोद्याचे सलामीवीर शाश्वत रावत आणि अभिमन्यू सिंग राजपूत यांनी स्फोटक शैलीत फलंदाजी केली.

बडोद्याची चांगली सुरुवात : सहाव्या षटकात संघाची पहिली विकेट पडली, तोपर्यंत संघानं 92 धावा केल्या होत्या. या धावसंख्येवरुन संघानं कोणत्या शैलीत फलंदाजी केली असेल हे समजू शकते. अभिमन्यूनं बाद होण्यापूर्वी केवळ 17 चेंडूत 53 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्यानं 5 षटकार आणि 4 चौकार लगावले. तर दुसरा सलामीवीर शाश्वत रावतनं आपल्या संघासाठी 16 चेंडूत 43 धावा जोडल्या. तिसरा आलेला भानू पुनिया अधिक आक्रमक खेळला. त्यानं 51 चेंडूत 134 धावा केल्या. त्याच्या खेळीमध्ये 15 षटकार आणि 5 चौकार होते.

बडोद्याच्या डावात एकूण 37 षटकार : 20 षटकांच्या अखेरीस फलंदाजांनी संघाची धावसंख्या 349 धावांवर नेली. T20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघानं या फॉरमॅटमध्ये एवढी मोठी धावसंख्या उभारली आहे. जर आपण T20 बद्दल बोलत आहोत, तर त्यात जगभरात खेळल्या जाणाऱ्या T20 आंतरराष्ट्रीय आणि T20 लीगचा देखील समावेश आहे. एवढंच नाही तर बडोद्यानं सामन्यादरम्यान एकूण 37 षटकार मारले. T20 मध्ये कोणत्याही एका संघानं मारलेले सर्वाधिक षटकार आहे. याआधी, काही दिवसांपूर्वी झिम्बाब्वे आणि गांबिया यांच्यातील सामन्यात झिम्बाब्वेनं एका डावात 27 षटकार ठोकले होते. आता अवघ्या काही दिवसांनी हा विक्रम मोडीत निघाला आहे.

हेही वाचा :

  1. 37/1 ते 57/10... आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात 20 धावांत गमावल्या सर्व विकेट
  2. पाकिस्तानचा तिसऱ्या सामन्यात पराभव करत झिम्बाब्वे बदला घेणार? शेवटचा T20 मॅच 'इथं' दिसेल लाईव्ह
Last Updated : Dec 5, 2024, 1:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details