रावळपिंडी BAN vs NZ 6th Match Live Streaming : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सहावा सामना आज 24 फेब्रुवारी रोजी बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता रावळपिंडीतील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना : हा ग्रुप अ चा चौथा सामना असेल. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. बांगलादेशला पहिल्या सामन्यात टीम इंडियाविरुद्ध 6 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. अशा परिस्थितीत बांगलादेशसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. दुसरीकडे, कीवी संघ सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव केला. अशा परिस्थितीत, ते बांगलादेशविरुद्ध मोठा विजय नोंदवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरतील. परिणामी दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळेल. तसंच या सामन्यावर पाकिस्तानचही लक्ष असेल, कारण त्यांनी स्पर्धेतील आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी या सामन्यात बांगलादेशनं विजय मिळवणं गरजेचं आहे. जर न्यूझीलंडनं हा सामना जिंकला तर पाकिस्तान पुर्णपणे स्पर्धेच्या बाहेर पडेल.
रावळपिंडीची खेळपट्टी कशी असेल : बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. जिथं फलंदाजांकडून चांगली कामगिरी अपेक्षित असते. या मैदानावर शेवटचा वनडे सामना 2023 मध्ये खेळला गेला होता. जेव्हा पाकिस्ताननं न्यूझीलंडविरुद्ध दोन सामने खेळले. दोन्ही सामने हाय स्कोअरिंग होते. पहिल्या सामन्यात पाकिस्ताननं ब्लॅक कॅप्सविरुद्ध 289 धावांचा पाठलाग केला, तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी 337 धावांचा मोठा आकडा गाठला. या मैदानावर नवीन चेंडू वापरताना वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. पण एकदा फलंदाज स्थिरावला की तो मोठी खेळी खेळू शकतो. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
वनडे सामन्यांचा रेकॉर्ड कसा : मीडिया रिपोर्ट्सनुसार, रावळपिंडीतील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 26 वनडे सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 11 वेळा विजय मिळवला आहे, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं 14 वेळा विजय मिळवला आहे. याशिवाय एक सामना बरोबरीत सुटला आहे.
दोन्ही संघांची हेड-टू-हेड रेकॉर्ड : वनडे स्वरुपातील दोन्ही संघांच्या आकडेवारीबद्दल बोललो तर बांगलादेश आणि न्यूझीलंड आतापर्यंत 45 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. आतापर्यंत यात न्यूझीलंडचं पूर्ण वर्चस्व दिसून आलं आहे. किवी संघानं 45 पैकी 33 सामने जिंकले आहेत. बांगलादेशनं फक्त 11 सामने जिंकले आहेत आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. त्याच वेळी, जर आपण चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोललो तर, या स्पर्धेत बांगलादेश आणि न्यूझीलंड दोनदा आमनेसामने आले आहेत, जिथं दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. तसंच जर आपण गेल्या पाच वनडे सामन्यांबद्दल बोललो तर तिथंही न्यूझीलंडने बांगलादेशवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे. या पाचपैकी कीवी संघानं चार तर बांगलादेशनं एक सामना जिंकला आहे. ही आकडेवारी पाहिल्यानंतर असं म्हणता येईल की जेव्हा दोन्ही संघ रावळपिंडी स्टेडियमवर एकमेकांसमोर येतील तेव्हा न्यूझीलंड हा सामना जिंकण्याचा प्रबळ दावेदार असेल.
बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा सहावा सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?