शारजाह AUSW vs SLW Live Streaming : ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा पाचवा सामना गतविजेता ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघ यांच्यात आज 5 ऑक्टोबर रोजी शारजाह इथं होणार आहे.
पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव : श्रीलंकेच्या संघाला स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 20 षटकांत सर्वबाद 116 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला 9 गडी गमावून केवळ 85 धावा करता आल्या. मात्र त्यांनी सराव सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत दोन्ही सामने जिंकले होते.
गतविजेत्यांचा पहिला सामना : दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघ या स्पर्धेची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानं करणार आहे. यापुर्वी इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सराव सामन्यांमध्ये संघानं शानदार विजय नोंदवले होते. या सामन्यात विजय मिळवत आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात करण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल तर हा सामना जिंकत श्रीलंकन संघ स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.
हेड-टू-हेड रेकॉर्ड : ऑस्ट्रेलिया महिला आणि न्यूझीलंड महिला T20I मध्ये आतापर्यंत 26 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात 16 वेळा ऑस्ट्रेलियन संघानं विजय मिळवला आहे तर श्रीलंकेनं 10 सामने जिंकले आहेत. परिणामी दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना अपेक्षित आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा पाचवा सामना ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला कधी खेळला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा पाचवा सामना ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला शनिवार, 5 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा पाचवा सामना ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला कुठं खेळवला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा पाचवा सामना ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह इथं होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा पाचवा सामना ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला सामना किती वाजता सुरु होईल?