हैदराबाद : तुम्ही पुढच्या नवीन फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला 2025 मध्ये अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. स्मार्टफोन ब्रँड्स 2025 मध्ये नवीन पर्याय आणि अपग्रेड फोल्डेबल फोन लॉंच करणार आहेत. ज्यामध्ये नवीन वैशिष्ट्ये, डिझाइन आणि कार्यप्रदर्शन समाविष्ट असेल.
हे फोन होतील लॉंच : 2025 मध्ये Galaxy Z Fold 7, OnePlus Open 2, Pixel 10 Pro Fold असे विविध फोल्डेबल फोन मार्केटमध्ये लॉंच होणार आहेत. ज्यामध्ये नवीन वैशिष्ट्ये, डिझाइन आणि कार्यप्रदर्शन समाविष्ट असेल. Galaxy Z Fold 7, OnePlus Open, 2 आणि Motorola Razr 60 सीरीजसह काही प्रमुख मॉडेल्सची तुम्हाला वाट पाहवी लागणार आहे. आम्ही तुम्हाला 2025 मध्ये लॉंच होणाऱ्या निवडक फोल्डेबल फोनची माहिती देत आहोत.
Samsung Galaxy Z Fold 7 आणि Z Flip 7 : सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोन्सची पुढची आवृत्ती लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यात Z Fold 7 आणि Galaxy Z Flip 7 या या फोनचा समावेश असेल. दोन्ही फोन अपग्रेड केलेले प्रोसेसर असेल. सॅमसंग यावर्षी एक्झिनॉस चिपसह Z फ्लिप 7 लाँच करण्याची शक्यता आहे. याशिवाय झेड फ्लिप फोनची स्वस्त आवृत्ती देखील लॉंच होऊ शकते.
OnePlus Open 2 : अहवालानुसार, OnePlus 2025 च्या पहिल्या तिमाहीत ओपन 2 लाँच करू शकते. हा फोन अपग्रेडेड स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट आणि 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. याव्यतिरिक्त, फोनची जाडी न वाढवता यात मोठी 5700mAh बॅटरी असू शकते.
Google Pixel 10 Pro Fold : Google सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2025 मध्ये त्याचा Pixel 10 Pro Fold लाँच करू शकते. त्याच्या पूर्ववर्ती Pixel 9 Pro Fold ने कॅमेरा क्षमतेपेक्षा स्लिम डिझाइनला प्राधान्य दिलं आहे. Pixel 10 Pro Fold मध्ये Google चा Tensor G5 चिपसेट असू शकतो, जो AI क्षमता सुधारेल. लीकनुसार, डिव्हाइसमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह LTPO AMOLED डिस्प्ले असू शकतो. उघडल्यावर, डिस्प्लेचा आकार 8.0 इंच असेल, तर फोल्ड केल्यावर तो 6.3 इंच होईल. यात 16GB RAM आणि 256GB/512GB स्टोरेज पर्याय असू शकतात.
Motorola Razr 60 : टेक कंपनी मोटोरोला 2025 मध्ये आपला नवीन फोल्डेबल स्मार्टफोन Razr 60 सरींज लॉंच करू शकते. या आगामी हँडसेटमध्ये Razr 60 आणि Razr 60 Ultra यांचा समावेश असू शकतो. हे उपकरण Razr 50 मालिकेत अपग्रेड केलेल्या वैशिष्ट्यांसह येऊ शकतात. यात Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, 6.9-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि अल्ट्रा व्हेरियंटमध्ये 4000mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे.
Oppo ट्राय-फोल्ड फोन : ओप्पोनं ऑगस्टमध्ये ट्राय-फोल्ड स्मार्टफोन संकल्पना सादर केलीय, ज्यामध्ये दोन बिजागर आणि अत्यंत पातळ बेझल्सचा मुख्य डिस्प्ले आहे. यात टेक्सचर्ड फॉक्स लेदर बॅक आणि क्रोम बॉर्डर देखील असू शकते. डिव्हाइस ColorOS UI च्या सुधारित आवृत्तीसह येऊ शकते, ज्यामध्ये मोठ्या विजेट्स आहेत. या फोल्डेबल फोन्सच्या लॉंचमुळं स्मार्टफोन बाजारात आणखी नावीन्य पर्याय येतील अशी अपेक्षा आहे.
हे वाचलंत का :