ETV Bharat / state

काळ आला होता पण वेळ नाही;... अन् डॉक्टरांनी मृत घोषित केलेले आजोबा झाले जिवंत - PANDURANG ULPE

कोल्हापुरातील कसबा बावडा भागात 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय आलाय. डॉक्टरांनी मृत घोषित केलेले पांडुरंग उलपे (Pandurang Ulpe) यांचा जणू पुनर्जन्मच झाला.

Pandurang Ulpe
पांडुरंग उलपे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2025, 5:19 PM IST

Updated : Jan 2, 2025, 5:38 PM IST

कोल्हापूर : देवाचं नामस्मरण करता करता मरण यावं असं म्हणतात. अशीच एक घटना कोल्हापुरात घडलीय. मात्र या घटनेत मोठा ट्विस्ट आहे. कसबा बावड्यात नेहमीप्रमाणे पंढरीच्या विठुरायाचं नामस्मरण करत असताना अचानक बसल्या जागी पांडुरंग उलपे यांना घाम येऊन हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यावेळी धावाधाव करून कुटुंबीयांनी पांडुरंग यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र प्रकृती खालावल्यानंतर डॉक्टरांनी सोमवारी रात्री उशिरा पांडुरंग त्यांची हालचाल थांबल्यानं (Pandurang Ulpe) त्यांना घरी न्यायला सांगितलं. घरी अंत्यविधिची सगळी तयारी करण्यास सुरुवात झाली. मात्र वाटेतच जणू चमत्कार घडला. रुग्णवाहिकेत त्यांच्याजवळ बसलेल्यांना त्यांची हालचाल जाणवली. त्यांनी मग ताबडतोब जराही वेळ न घालवता पांडुरंग उलपे यांना पुन्हा दवाखान्यात नेलं.

काळ आला होता पण वेळ नाही : घरी तर पै पाहुण्यांकडून आणि उलपे कुटुंबीयांकडून अंत्यविधीची तयारी करण्यात आली होती. पण रुग्णवाहिकेतून तात्यांना घरी आणताना रस्त्यातील खड्ड्यामुळे ॲम्ब्युलन्सला धक्का बसला आणि पांडुरंग यांच्या शरीराची हालचाल झाली. सोबत असलेल्या नातेवाईकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा रुग्णवाहिका थेट हॉस्पिटलकडं वळवली. यावेळी डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. पांडुरंग यांच्या जणू जीवात जीव आला होता. साक्षात पांडुरंगाची कृपा झाली आणि 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' अशीच काहीशी स्थिती पांडुरंग रामा उलपे यांच्याबाबत झाली. दवाखान्यात दाखल केल्यावर पांडुरंग यांच्या हृदयाचे ठोके पूर्ववत सुरू झाले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

मृत घोषित केलेले पाडुरंग आजोबा जिवंत झाले (ETV Bharat Reporter)

जप करताना आला हृदयविकाराचा झटका : पंढरपूरच्या विठुरायाची सेवा करणारे वारकरी संप्रदायातील पांडुरंग उलपे पत्नी बाळाबाई यांच्यासोबत मळ्यात राहतात. दरवर्षी न चुकता पंढरपूरची वारी करणारे पांडुरंग हे सोमवारी संध्याकाळी घरीच अखंड हरिनामाचा जप करत बसले होते. अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, अंगाला घाम आला आणि काही क्षणातच ते बसल्या ठिकाणी कोसळले. पत्नी बाळाबाई यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडा ओरड करून शेजाऱ्यांना बोलावलं आणि तत्काळ शेजाऱ्यांनी गंगावेश येथील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केलं. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचार सुरू असतानाच सोमवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान पांडुरंग यांची हालचाल बंद झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्यास सांगितलं, अशी माहिती नातू ओंकार रामाने यांनी दिली.

अन् पाडुरंगाचा पुनर्जन्म झाला : हॉस्पिटलमधून रुग्णवाहिका घरी येताना वाटेत ॲम्बुलन्स एका खड्ड्यातून स्पीड ब्रेकरवर आदळली आणि याचा झटका लागून पांडुरंग यांच्या शरीरात हालचाल झाल्याचं सोबत बसलेल्या नातेवाईकांच्या लक्षात आलं. त्यांनी तत्काळ ॲम्बुलन्स कसबा बावड्यातील डी वाय पाटील हॉस्पिटलकडं वळवली. मात्र डॉक्टरांनी उपचार करण्याआधी खात्री दिली नाही. डॉक्टरांनी केलेले अथक प्रयत्न आणि पांडुरंग यांच्या इच्छाशक्तीच्या बळावर पांडुरंग यांनी मृत्यूवरही विजय मिळवला. दोन दिवसात हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असल्याची माहिती ओंकार रामाने यांनी दिली.

वारकरी संप्रदायानं केलं स्वागत : संत तुकाराम यांनी सदेह वैकुंठगमन केलं असं म्हणतात. इथे पांडुरंग भक्त पांडुरंग उलपे यांच्याबाबतीत उलट घटना घडल्याची भावना गावातील विठ्ठल भक्तांनी बोलून दाखवली. पांडुरंग उलपे हे सदेह वैकुंठातून जणु परत आल्याचं समजून बुधवारी सकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पांडुरंग यांचं वारकरी संप्रदायातील सहकाऱ्यांनी जोरदार स्वागत केलं. पांडुरंग याचं औक्षण करून त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं अशी प्रार्थना पांडुरंग चरणी करण्यात आली. फुलांच्या पायघड्या घालून वारकरी पांडुरंग उलपे यांचं स्वागत करण्यात आलं. तर पाडुरंग यांना पुनर्जन्म मिळाल्याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.

डॉक्टरांचे मत - यासंदर्भात आम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला असता अशा पद्धतीनं कधीकधी घडू शकतं, त्याला काही कारणं असू शकतात असं सांगितलं. अशी उदाहरणंही असल्याचं ते म्हणाले. एखाद्या व्यक्तीचा तीन प्रकारे मृत्यू होतो. यामध्ये कधीकधी व्यक्तीचा मृत्यू झालेला नसतो. मात्र बहुतांश वैद्यकीय परिमाणं मृत्यू दर्शवतात. त्यातून अशा घटना घडतात. अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

हेही वाचा -

  1. ठाण्यातील विहिरींचा होणार पुनर्जन्म, महापालिका करणार ६७ विहिरींचे पुनरुज्जीवन
  2. डॉक्टरांमुळेच माझा पुनर्जन्म झाला, माझ्यासाठी ते देवदूत..!
  3. VIDEO : लॉब्स्टरच्या पुनर्जन्माचे दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यात झाले कैद..

Last Updated : Jan 2, 2025, 5:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.