महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

न्यूझीलंडचं टी-20 विश्वचषकाचं स्वप्न भंगलं; अफगाणिस्ताननं वाट अडवली, कसं ते वाचा... - T20 World Cup 2024 - T20 WORLD CUP 2024

T20 World Cup 2024 : त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं पापुआ न्यू गिनीचा 7 गडी राखून पराभव केलाय. या विजयासह अफगाणिस्ताननं टी-20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 मध्ये स्थान मिळवलं आहे.

T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 2:45 PM IST

T20 World Cup 2024 PNG vs AFG :आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 मधील 29व्या सामन्यात अफगाणिस्ताननं पापुआ न्यू गिनीचा 7 विकेट्सनं पराभव केलाय. 14 जून (शुक्रवार) तारुबा येथील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पापुआ न्यू गिनीनं अफगाणिस्तानला विजयासाठी 96 धावांचं लक्ष्य दिलं होतं, जे अफगाणिस्ताननं 29 चेंडू राखून पूर्ण केलं.

या सामन्यात अफगाणिस्तानकडून गुलबदिन नइबनं 36 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या, ज्यात 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. तर मोहम्मद नबी 16 धावांवर नाबाद राहिला. यष्टिरक्षक फलंदाज रहमानउल्लाहनं 11 आणि अजमतुल्ला उमरझाईनं 13 धावांचं योगदान दिलं. पापुआ न्यू गिनीकडून एली नाओ, सेमो कामिया आणि नॉर्मन वानुआ यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

पापुआ न्यू गिनीचे चार फलंदाज धावबाद :नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पापुआ न्यू गिनीचा संपूर्ण संघ पूर्ण 20 षटकंही खेळू शकला नाही. पापुआ न्यू गिनीनं 19.5 षटकांत 95 धावा केल्या. यष्टिरक्षक फलंदाज किपलिन डोरिगानं सर्वाधिक 27 धावा केल्या. याशिवाय फक्त एली नाऊ आणि टिनो उरा यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकीनं सर्वाधिक 3 बळी घेतले. नवीन उल हकनं 2, तर नूर अहमदला 1 विकेट मिळाली. पापुआ न्यू गिनीचे चार फलंदाज धावबाद झाले.

न्यूझीलंडचं स्वप्न भंगलं :अफगाणिस्तान संघानं या विजयासह सुपर-8 मध्ये स्थान मिळवलंय. वेस्ट इंडिजचा संघ क गटातून आधीच सुपर-8 मध्ये पोहोचला आहे. न्यूझीलंडनं या स्पर्धेत आतापर्यंत फक्त 2 सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात अफगाणिस्ताननं 84 धावांनी तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजनं 13 धावांनी पराभव केलाय. सध्या न्यूझीलंडचे 2 सामन्यात 0 गुण आहेत. अशा स्थितीत न्यूझीलंडनं उरलेले दोन सामने जिंकले तरी त्यांचे फक्त 4 गुण होऊ शकतात, तर अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 6 गुणांसह सुपर-8 मध्ये स्थान मिळवलं आहे. याशिवाय भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनीही प्ले ऑफमध्ये प्रवेश केलाय. म्हणजेच आतापर्यंत पाच संघ सुपर-8 मध्ये पोहोचले आहेत.

टी-20 विश्वचषकात 100 किंवा त्यापेक्षा कमी धावा झालेले सामने

  • 9* - 2024
  • 8 - 2014, 2021
  • 4 - 2010
  • 3 - 2007, 2009, 2012
  • 2 - 2016
  • 1- 2022

अफगाणिस्तानसाठी टी-20 मध्ये 50 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारे खेळाडू

  • 142 - राशिद खान
  • 95 - मोहम्मद नबी
  • 59 - मुजीब उर रहमान
  • 50 - नवीन-उल-हक

हेही वाचा

  1. टी-20 विश्वचषकात इंग्लंडचा धुमाकूळ, अवघ्या 19 चेंडूत 'खेळ संपला' - T20 World Cup 2024
  2. नागपूरच्या 'दिव्या देशमुख'नं पटकावलं विश्व ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद; 15 वर्षानंतर पदकाचा संपला दुष्काळ - DIVYA DESHMUKH News
  3. टी 20 क्रिकेट विश्वचषक विजेतेपदाचा दावेदार कोण? रोहित शर्माचे कोच दिनेश लाड म्हणाले... - Dinesh Lad Exclusive

ABOUT THE AUTHOR

...view details