महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

42 वर्षीय खेळाडूनं दिलं IPL मेगा लीलावासाठी नाव; 15 वर्षांपासून खेळला नाही एकही आंतरराष्ट्रीय T20 सामना

IPL 2025 च्या मेगा लिलावासाठी 1574 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली आहे. त्यात एका अशा खेळाडूचं नाव आहे ज्यानं 15 वर्षांपासून एकही T20I सामना खेळलेला नाही.

james anderson
जेम्स अँडरसन (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : 4 hours ago

मुंबई 42 Years Old Player Registered for IPL 2025 Mega Auction : भारताची T20 क्रिकेट लीग म्हणजेच IPL ही जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीग आहे. जगातील प्रत्येक क्रिकेटपटूचं IPL मध्ये खेळण्याचं स्वप्न असतं पण ते काही खेळाडू पूर्ण करु शकतात. IPL मध्ये खेळण्याची इच्छा खेळाडूंमध्ये इतकी प्रबळ आहे की निवृत्तीनंतरही त्यांना या लीगचा भाग व्हायचं आहे.

कुठं होणार लिलाव : वास्तविक, 5 नोव्हेंबर रोजी BCCI नं IPL 2025 च्या मेगा लिलावाबाबत एक मोठी घोषणा केली. 18 व्या हंगामापूर्वी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया इथं IPL 2025 चा मेगा लिलाव आयोजित केला जाईल असं सांगण्यात आलं. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी IPL चा लिलाव परदेशात होणार आहे. IPL 2024 पूर्वीचा शेवटचा लिलाव दुबई शहरात झाला होता.

1574 खेळाडूंनी केली नोंदणी : IPL मेगा लिलावासाठी 1165 भारतीय खेळाडूंसह एकूण 1574 क्रिकेटपटूंनी आपली नावं नोंदवली आहेत. यात 320 कॅप्ड आणि 1224 अनकॅप्ड खेळाडू आणि IPL सहयोगी देशांतील 30 खेळाडूंचा समावेश आहे. या आकडेवारीवरुन जगभरात IPL ची किती क्रेझ आहे, याचा अंदाज येऊ शकतो. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिलावासाठी एका दिग्गज गोलंदाजानंही आपलं नाव दिलं असून, तो 42 वर्षांचा असून त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. आपण ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 991 विकेट घेतल्या आहेत. जेम्स अँडरसन असे या खेळाडूचं नाव असून त्यानं IPL लिलावात आपलं नाव नोंदवलं आहे.

15 वर्षांपूर्वी खेळला शेवटचा T20I सामना : कसोटी क्रिकेटमध्ये 700 हून अधिक बळी घेणाऱ्या अँडरसननं यावर्षी जुलैमध्ये क्रिकेटला अलविदा केला. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अँडरसननं T20 क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो म्हणाला होता की मला अजूनही क्रिकेट खेळायचं आहे आणि T20 क्रिकेटमध्ये हात आजमावण्याचा विचार करत आहे. त्याला फ्रँचायझी क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे, असं तो म्हणाला होता. मात्र तो IPL च्या मेगा लिलावात दिसणार असं कुणालाही वाटलं नव्हते.

2009 मध्ये खेळला शेवटचा T20I सामना : उल्लेखनीय आहे की, जेम्स अँडरसननं मेगा लिलावासाठी त्याची मूळ किंमत 1.25 कोटी रुपये ठेवली आहे. अँडरसननं 15 वर्षांपूर्वी 2009 मध्ये इंग्लंडसाठी शेवटचा T20I सामना खेळला होता, तर T20 क्रिकेटमध्ये त्याचा शेवटचा सामना 2014 मध्ये खेळला होता. आता IPL लिलावात त्याला कोणता संघ विकत घेतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. 641 कोटी रुपये, 1574 खेळाडू... कोण होणार करोडपती? वाचा सर्व अपडेट
  2. अफगाणिस्तान पुन्हा इतिहास रचणार की बांगला टायगर्स बाजी मारणार? एतिहासिक वनडे मॅच 'इथं' पाहा लाईव्ह

ABOUT THE AUTHOR

...view details