अबूधाबी 30 Runs in 3 Balls : गेल्या अनेक वर्षात व्यावसायिक क्रिकेटमध्ये गोलंदाजांची नवनवीन विक्रम केले आहेत. अनेक वेळा एका षटकांत 30 धावा, 36 धावा आणि अगदी 42 धावा झाल्या आहेत. पण हे सर्व वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळालं आहे. पण एका षटकात फक्त 3 चेंडूत 30 धावा, हे ऐकून कोणाचेही कान टवकारतील आणि डोळे उघडे राहतील. हे सर्व अबू धाबी T10 लीगच्या एका सामन्यात घडले, जिथं हे आता सामान्य झाले आहे आणि मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप होऊ लागले आहेत.
लीगमध्ये दिग्गजांचा समावेश : अबूधाबी T10 लीगनं गेल्या 4-5 वर्षांपासून क्रिकेटच्या सर्वात लहान अनधिकृत स्वरुपात आपला ठसा उमटवला आहे. याआधी बहुतेक अज्ञात किंवा कमी प्रसिद्ध क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळत असत, परंतु जगभरात T20 आणि T10 क्रिकेट लीगच्या वाढत्या लोकप्रियतेमुळं आता प्रसिद्ध क्रिकेटपटूही यामध्ये खेळत आहेत. इथं तुफानी फलंदाजी पाहायला मिळत आहे मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळत आहे ती चेष्टेचा विषय बनली आहे.
तुफानी फलंदाजी, लज्जास्पद गोलंदाजी :25 नोव्हेंबर रोजी दिल्ली बुल्स आणि बांगला टायगर्सच्या संघांत सामना झाला. या सामन्यात दिल्लीनं प्रथम फलंदाजी करताना 10 षटकांत 6 गडी गमावून 123 धावा केल्या. त्यांच्यासाठी आठव्या क्रमांकाचा फलंदाज निखिल चौधरीनं सर्वाधिक 47 धावा केल्या, त्याही केवळ 16 चेंडूंत, ज्यात 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. यातील निखिलनं एकाच षटकांत 28 धावा केल्या.
3 चेंडूत 30 झाला : निखिलनं चौकार आणि षटकार खेचून या धावा केल्या, पण चर्चा त्याची नाही, तर ज्या गोलंदाजानं ही षटक टाकली त्याची झाली, तीही त्याच्या धक्कादायक गोलंदाजीनं. हा गोलंदाज होता दासून शनका. या षटकात त्यानं 33 धावा खर्च केल्या, परंतु त्यापैकी 30 धावा फक्त 3 चेंडूत आल्या. होय, त्याच्या 3 कायदेशीर चेंडूंमध्ये 30 धावा झाल्या आणि हे घडलं कारण शनकानं खराब गोलंदाजीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि एका ओव्हरमध्ये 3 चेंडूंसह 4 नो-बॉल टाकले.
कशा निघाल्या धावा : त्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला गेला. त्यानंतर पुढचे दोन चेंडू नो बॉल होते आणि त्यावरही चौकार मारले गेले. पुढच्या चेंडूवर म्हणजेच दुसऱ्या योग्य चेंडूवर चौकार मारला गेला. त्यानंतर तिसऱ्या अचूक चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर पुढचा चेंडू नो-बॉल होता पण एकही धाव झाली नाही. यानंतर त्यानं पुन्हा नो बॉल टाकला आणि त्यावर चौकार मारला. म्हणजे चित्र असं काहीतरी होतं - 4, 4(nb), 4(nb), 4,6,(nb), 4(nb).
मॅच फिक्सिंगची चर्चा? : शनकानं पुन्हा पुनरागमन केले आणि शेवटच्या 3 चेंडूंवर प्रत्येकी एकच धाव दिली आणि षटकांत 33 धावा खर्ची पडल्या. पण ज्या पद्धतीनं त्याचे नो-बॉल होते, ते आणखी धक्कादायक होतं. नो-बॉलवर त्याचा पाय जवळपास एक फूट क्रीजच्या बाहेर होता. सामान्यत: नो-बॉल एक किंवा दोन सेंटीमीटर किंवा एक किंवा दोन इंचापर्यंत दिसतो, परंतु एक फुटाचा नो-बॉल संशयाच्या कक्षेत ठेवण्यासाठी पुरेसा असतो. साहजिकच यातून मॅच फिक्सिंगचे आरोप होणं साहजिकच होतं आणि तेच घडलं. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी उघडपणे याला फिक्सिंग म्हटलं आणि टूर्नामेंट बंद करण्याची मागणी केली.
हे सर्व आयसीसीच्या नाकाखाली : ही काही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी आणखी एका गोलंदाजानं असाच लांबलचक नो-बॉल टाकला होता. अशी दृश्यं गेल्या काही सीझनमध्येही पाहायला मिळत आहेत. हे देखील धक्कादायक आहे कारण शनका हा लहान काळातील खेळाडू नसून तो श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे आणि 2 वर्षांपूर्वी आशिया कप जिंकणारा माजी कर्णधारही होता. तो अलीकडेपर्यंत संघाचा भाग होता. याशिवाय, हे सर्व आयसीसीच्या नाकाखाली घडत आहे कारण आयसीसीचं मुख्यालय दुबईमध्ये आहे, ते अबुधाबीपासून हाकेच्या अंतरावर. अशा परिस्थितीत आयसीसी यावर कारवाई करणार का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून सोशल मीडियावर विचारला जातोय.
हेही वाचा :
- आत्मविश्वास असावा तर असा... निर्णायक सामन्याच्या 15 तासांआधीच संघाची प्लेइंग 11 जाहीर
- संघाच्या धावा 148, त्यात एका फलंदाजाचं शतक; वनजे क्रिकेटमध्ये घडला इतिहास
- कुठुन येतो इतका कॉन्फिडन्स? पहिला सामना हरल्यानंतरही दुसऱ्या सामन्याच्या 16 तासांआधी प्लेइंग 11 जाहीर