गयाना 124 Meter Six : आयपीएलनंतर जर सर्वात स्फोटक फलंदाजी कोणत्याही लीगमध्ये पाहायला मिळत असेल तर ती नक्कीच कॅरेबियन प्रीमियर लीग आहे. असंच काहीसं CPL 2024 मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. या लीगमध्ये पुन्हा एकदा क्लास आणि पॉवर हिटिंगचा अप्रतिम संगम दिसून येत आहे. CPL 2024 च्या 19 व्या सामन्यातही हेच पाहायला मिळालं. गयाना ॲमेझॉन वॉरियर्सविरुद्ध त्रिनबागो नाइट रायडर्सचा फलंदाज शक्केरे पॅरिसनं असा एक फटका मारला की, सारं क्रिकेट जग थक्क झालं. या 21 वर्षीय खेळाडूनं 124 मीटर लांब षटकार मारला, जो क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात लांब षटकार आहे.
शकेरे पॅरिसचा 124 मीटर लांब षटकार : गयानाचा डावखुरा फिरकी गोलंदाज गुडाकेश मोटीच्या चेंडूवर शकेरे पॅरिसनं हा षटकार ठोकला. त्यानं मोटीचा उडणारा चेंडू मिड-विकेटवर मारला. हा शॉट इतका चांगला लागला गेला की चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला. मोठी गोष्ट म्हणजे सीपीएलमधील हा सर्वात लांब षटकार आहे, जरी क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब षटकार अजूनही दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू ॲल्बी मॉर्केलच्या नावावर आहे.