महाराष्ट्र

maharashtra

दुसऱ्या श्रावण सोमवारी महादेवाला वाहा 'ही' शिवमूठ; वाचा सविस्तर - Second Shravan Somwar

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 11, 2024, 12:43 PM IST

Second Shravan Somwar : श्रावण महिन्याची (Shravan 2024) सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराला शिवमूठ वाहली जाते. आता दुसऱ्या श्रावणी सोमवारी शंकराला कोणती शिवामूठ वाहायची. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

second shravan somwar 2024
दुसरा श्रावणी सोमवारी (File Photo)

हैदराबाद Second Shravan Somwar :श्रावणसरी अंगावर बरसु लागल्या की, बालकवी त्र्यंबक ठोमरे यांची "श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे" या कवितेची आठवण येते. श्रावण महिना (Shravan 2024) हा अत्यंत पवित्र महिना (Shravan 2024) मानला जातो. श्रावण महिन्याची सुरूवात झाली (Shravan Somwar) आहे. यावर्षी 2 सप्टेंबर रोजी श्रावण समाप्त होणार आहे.

दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ :श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराला शिवमूठ वाहली जाते. शंकराला दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ वाहायची आहे.

तिळाची शिवामूठ का? : स्नेह याचा अर्थ प्रेम, जिव्हाळा, जवळिक साधणे हा आहे. शरीर आणि मन जोडणारी तिळाची शिवामूठ वाहताना हा स्नेहभावच आपण शंकराला अर्पण करत असतो. समुद्र मंथनानंतर बाहेर पडलेले विष शंकराने प्राशन केलं आणि मनुष्य जिवाचा धोका टळला. त्याचं हे ऋण फेडण्यासाठी श्रावणात सोमवारी ही तिळाची शिवामूठ वाहिली जाते. संसारातील अडचणींना स्नेह भावाने सामोरे जायचं हाच तर संदेश या दुसऱ्या तिळाच्या शिवामुठीत लपला आहे.

काय आहे तिळाचं महत्त्व :आयुर्वेदात तिळाच्या तेलाला फार महत्त्व आहे. तिळाचं तेल हे सांधेदुखी, वात, स्थूलता कमी करण्यासाठी, दृष्टी सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले आहे. ‘ब’ जीवनसत्त्व, फायबर, आयर्न, कॅल्शिअमयुक्त तीळ स्वयंपाकात आवर्जून वापरतात. थंडीच्या दिवसात भोगीला तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि तिळगूळ, तिळाचे लाडू आणि तीळ घालून केलेली गुळाची पोळी, हे सर्व आरोग्याशी निगडित आहे.

हेही वाचा -

  1. ऑगस्टचा दुसरा आठवडा 'या' 5 राशींच्या लोकांसाठी ठरणार फलदायी; वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope
  2. आज पहिला श्रावण सोमवार; महादेवाला वाहावी 'ही' शिवामूठ, सर्व माहिती वाचा एका क्लिकवर - Shravan 2024

ABOUT THE AUTHOR

...view details