पंढरपूर Vitthal Rukmini Wedding :माघ महिन्यातील शुद्ध पंचमीला वसंत पंचमी साजरी केली जाते. हाच दिवस श्री विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा (Vitthal Rukmini wedding Ceremony) म्हणून साजरा करतात. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, नामदेव पायरी फुलांच्या माळांनी सजला आहे. तसंच श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला विवाहानिमित्त शाही पोशाखही तयार करण्यात आला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे आज श्री विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण मंदिर विविध फुलांनी सजवण्यात आलं होतं. आजच्या शाही विवाह सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.
विविध कार्यक्रमाचं आयोजन :या विवाह सोहळ्यासाठी 10 ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या शाही विवाह सोहळ्याची जय्यत तयारी मंदिर समितीच्या वतीनं केल्याची माहिती, अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. तसंच विवाह सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीनं वऱ्हाडी मंडळीची खास व्यवस्था करण्यात आली होती.
विवाह सोहळ्यासाठी लाईव्ह टेलिकास्टची सोय : विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अन्नछत्रांमध्ये विशेष प्रसादाची सोय करण्यात आली होती. सदर सोहळा भाविकांना लाईव्ह पाहता यावा, यासाठी मंदिर परिसरात एलईडी स्क्रीन, मंदिर समितीचे अधिकृत संकेतस्थळ, युट्युब आणि फेसबुक यासारख्या समाज माध्यमाद्वारे लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आलं होतं. सायंकाळी पाच वाजता नगरप्रदक्षिणामार्गाने श्रींच्या प्रतिकात्मक मूर्तींची सवाद्य मिरवणूक आणि शोभायात्रा काढण्यात येणार असल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं.
वसंत पंचमीला सरस्वती पूजा : माघ महिन्यामध्ये गणेश जयंती पाठोपाठ येणारा हिंदू धर्मियांसाठी आणखी एक खास दिवस म्हणजे 'वसंत पंचमी' होय. वसंत पंचमीचा दिवस सरस्वती पूजा म्हणूनही ओळखला जातो. हिंदू धर्मात सरस्वती देवीला ज्ञान आणि कलेची देवी म्हटलंय. यावेळी १४ फेब्रुवारीला 'वसंत पंचमी' साजरी होत आहे. या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची विशेष पूजा केली जाते. वाचन, लेखन आणि नृत्याच्या कृपेसाठी सरस्वतीचं स्मरण केलं जातं.
हेही वाचा -
- Vitthal Rukmini Temple : विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवतांच्या मंदिरांच्या संवर्धनासाठी 74 कोटी रुपये निधी मंजूर
- Video : जया एकादशी निमित्ताने विठुरायाच्या गाभाऱ्यात झेंडू फुलांची आरास
- Vitthal-Rukmini Temple : नवीन वर्षाला विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर सजले, पहा गाभाऱ्यातील प्रसंन्न सजावट