मेष (ARIES) :चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज आपल्यात उत्साहाचा अभाव राहील. तसंच रागाचं प्रमाण वाढल्यानं काम बिघडण्याची शक्यता आहे. तेव्हा रागावर नियंत्रण ठेवा. कार्यालयात अधिकारी, विरोधक आणि घरात कुटुंबीय यांच्याशी वादात न पडता शांत राहून दिवस घालवणं अधिक चांगलं. एखाद्या मंगल कार्यास किंवा बाहेरगावी जाण्याचा प्रसंग येईल.
वृषभ (TAURUS) :चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आज कामाचा खूप व्याप आणि खाण्या-पिण्याची बेपर्वाही यामुळं आरोग्य बिघडेल. वेळेवर जेवण व झोप न झाल्यानं मानसिक बेचैनी वाटेल. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता असल्यानं प्रवास करू नका. नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्यानं रोष ओढवून घ्याल. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्न करावेत.
मिथुन (GEMINI) :चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आज आपण मौज-मजा आणि मनोरंजन यांत विशेष रस घ्याल. कुटुंबीय, मित्रमंडळी आणि प्रिय व्यक्तीसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल. सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल. भिन्नलिंगी व्यक्तीचं आकर्षण वाटेल. प्रणयाराधनेची पूर्वपीठिका तयार होईल. सामाजिक जीवनात मान-सन्मानाचं धनी बनाल. हातून दान-धर्म आणि विधायक कामे होतील.
कर्क (CANCER): चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आजचा दिवस चिंतामुक्त राहील. कुटुंबियांना वेळ देऊ शकाल. त्यांच्या सहवासात घरात वेळ घालवाल. कार्यात सफलता मिळेल. नोकरदारांना नोकरीत लाभ होईल. सहकारी सहकार्य करतील. प्रकृती उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
सिंह (LEO) : चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज आपण शारीरिक, मानसिकदृष्टया शांतपणे काम कराल. सृजनात्मक कामांची अधिक गोडी लागेल. साहित्य आणि कला क्षेत्रांत काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. परोपकाराचे कार्य कराल. मनाला आनंद वाटेल.
कन्या (VIRGO) : चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आज आपणास प्रतिकूलतेस तोंड देण्यास तयार राहावं लागेल. आरोग्य विषयक तक्रारी राहतील. मनावर काळजीचं दडपड राहिल्यानं मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी खटका उडेल. आईच्या प्रकृतीची काळजी राहील. अभ्यासाच्या दृष्टीनं काळ चांगला नाही. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादी संबंधित समस्या उदभवतील. पैसा खर्च होईल.
तूळ (LIBRA) :चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. धाडस करणे, एखादे काम हाती घेणं यांसाठी दिवस अनुकूल आहे. योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आपणास लाभदायक ठरेल. कुटुंबात भावंडांशी आपलेपणा आणि खेळीमेळीचं वातावरण असेल. लहानशा प्रवासाचा बेत आखाल. विदेशातून चांगल्या बातम्या येतील.