मेष : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी आहे. धनलाभा बरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल. व्यापार करीत असाल तर व्यापार विस्ताराची योजना तयार कराल. मन एकदम ताजेतवाने राहील. आजचा दिवस मित्र आणि नातलगांसह आनंदात जाईल. जवळचा प्रवास होईल. आज हातून एखादे धार्मिक किंवा पुण्य कर्म होईल.
वृषभ : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आज आपण गोड वाणीमुळं इतरांना प्रभावित करू शकाल. तसेच त्यांच्याशी संबंधात सुसंवाद निर्माण करू शकाल. बैठका, चर्चा ह्यात सुद्धा आपणाला यश मिळेल. कष्टाचे अपेक्षित फळ मिळाले नाही तरी सुद्धा आपण त्या क्षेत्रात प्रगती पथावर राहाल. पचनसंस्थे संबंधी तक्रारी वाढून त्रास होईल. शक्यतो घरच्या खाण्याला प्राधान्य द्या. अभ्यासात गोडी वाढेल.
मिथुन : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज आपलं मन द्विधा बनेल. जास्त हळवेपणा मनाला बेचैन करेल. आईविषयी अधिक भावनाशील व्हाल. बौद्धिक चर्चेचे प्रसंग येतील पण त्यात वादविवाद टाळावेत. कौटुंबिक आणि स्थावर संपत्तीविषयी शक्यतो चर्चा टाळावी. आज शक्यतो प्रवास टाळा.
कर्क :चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्य सुरू करण्यास अनुकूलता लाभेल. मित्र आणि नातलग भेटतील. प्रिय व्यक्तीकडून आनंद मिळेल.पर्यटनाचे बेत आखाल. मनात प्रसन्नता राहील. आज केलेल्या कार्यात यश मिळवू शकाल. नोकरी-व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक लाभ होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
सिंह : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिकदृष्टया लाभदायी आहे. खर्च मात्र वाढतील. सर्वदूर असणार्या लोकांचे निरोप येतील आणि व्यवहारातून लाभ होतील. घरातील व्यक्तींकडून चांगले सहकार्य मिळेल. मित्र-मैत्रिणी सुद्धा मदत करतील. डोळे आणि दातांच्या तक्रारी वाढतील. उत्तम भोजन प्राप्ती होईल. आज आपल्या मधुर वाणीने इतरांची मने जिंकाल. कार्यात यश मिळवू शकाल.
कन्या :चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपले विचार समृद्ध होतील. आपल्या गोड बोलण्यामळं आपण फायदेशीर संबंध जुळवाल. व्यावसायिकदृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. प्रकृती उत्तम राहील. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. सुख, आनंद मिळेल. चांगल्या बातम्या समजतील. आनंददायी प्रवास होईल. उत्तम वैवाहिक सुखाचा अनुभव घ्याल.
तूळ :चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. आज आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अविचारी वर्तनाने अडचणीत याल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल. व्यावसायिक व्यक्तींशी मतभेद होतील. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. वाद टाळावेत. कोर्ट-कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. नातलगांचे गैरसमज होतील.