मेष : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आज सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट आणि मित्रांसह वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल. निसर्गाच्या सान्निध्यात सहलीला जाल. सरकारी आणि निम-सरकारी कामात यश मिळेल. दांपत्य जीवनात सुख मिळेल आणि सुसंवाद राहील. प्राप्तीचे नवीन स्त्रोत प्राप्त होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ :चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आजचा दिवस नवीन कामाचं नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नोकरी - व्यवसायात लाभदायी परिणाम मिळतील. पदोन्नती होईल. व्यापारात नवीन दिशा स्पष्ट होतील. सरकारकडून लाभ मिळण्याची बातमी मिळेल. मान-प्रतिष्ठा वाढेल. अडलेली कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात माधुर्य राहील.
मिथुन : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. आज दिवसभर थोडया प्रतिकूलतेला तोंड द्यावं लागेल. शरीरात उत्साहाचा अभाव राहील. त्यामुळं नियोजित काम पूर्ण होणार नाही. मानसिक चिंता राहील. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्यांचा मंद प्रतिसाद आपला उत्साहभंग करेल. वरिष्ठ अधिकार्यांशी वादविवाद करू नका. प्रतिस्पर्ध्यां पासून सावध राहा.
कर्क: चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज संताप आणि नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळं आज संयम राखणं आवश्यक आहे. खाण्या-पिण्याकडं लक्ष दिलं नाही तर प्रकृती नक्कीच बिघडेल. कुटुंबात वादविवाद होतील. खर्चात वाढ झाल्यानं आर्थिक चणचण भासेल. नवे संबंध उपयुक्त ठरतील. नवे काम सुरू न करणं हितावह राहील.
सिंह: चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पति-पत्नी दोघांपैकी एकाची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. परिणामतः प्रापंचिक गोष्टीपासून मन अलिप्त होईल. व्यापारीवर्गाने भागीदारांशी धैर्याने वागावे. सार्वजनिक जीवनात अपयश येणार नाही याची काळजी घ्या. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास आनंद देणारा नसेल.
कन्या : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख-शांती नांदेल. त्यामुळं मन प्रसन्न राहील. सुखदायक घटना घडतील. प्रकृती उत्तम राहील. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक लाभ होतील. कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य लाभेल. प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान स्वीकारून त्यात यशस्वी व्हाल.
तूळ : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आज आपण बौद्धिक कामे आणि चर्चा यांत अग्रस्थानी राहाल. आपली कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती यांतील प्रगती समाधान देईल. विनाकारण वाद - विवाद आणि चर्चेत पडू नका. आरोग्याच्या बाबतीत पचनक्रिये संबंधी तक्रारी राहतील. प्रिय व्यक्तीचा सहवास सुखदायक ठरेल.