हैदराबाद: हिंदू धर्मात अमावस्या (Amavasya 2024) तिथीला विशेष महत्त्व आहे. 2024 या वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे, याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी अमावस्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते. पितरांना प्रसन्न करायचं असेल तर अमावस्या तिथीला पितरांची पूजा केली जाते. असं केल्यानं सुख-समृद्धीत वाढ होते अशी मान्यता आहे. 2024 मध्ये मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या वर्षाच्या शेवटी येत आहे. यंदा अमावस्या तिथी 30 का 31 तारखेला नेमकी कधी आहे ते जाणून घ्या.
सोमवती अमावस्या 2024 शुभ मुहूर्त : पंचांगानुसार, 2024 च्या मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 30 डिसेंबरला पहाटे 4.01 वाजता सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 31 डिसेंबरला पहाटे 03:56 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 30 डिसेंबरला अमावस्या साजरी करण्यात येणार आहे. 30 डिसेंबरला सोमवार असल्यानं या तिथीला 'सोमवती अमावस्या' असं म्हटलं जातं.
काय दान करावं :अमावस्येच्या दिवशी दानधर्म केल्यानं शुभ फळ मिळतं, असं मानलं जातं. यंदा सोमवती अमावस्येच्या दिवशी नवीन वस्त्रे, हिरवे मूग, पन्ना, पितळेचे भांडे, कापूर आणि पुस्तकं दान करणं शुभ मानलं जातं. केतू महादशा टाळण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी तीळ, लसूण, घोंगडी, कस्तुरी, उडीद इत्यादी वस्तूंचं दान करणं शुभ मानल जात.