महाराष्ट्र

maharashtra

पितृपंधरवड्यामध्ये 'या' राशींना होणार लाभ; कालसर्प आणि पितृदोषापासून मिळेल मुक्ती, वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

Weekly Horoscope : पितृपक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यंदाचा पितृपक्ष (Pitru Paksha) 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीपर्यंत चालेल. या दरम्यान पिंडदान, तर्पण, हवन आणि अन्नदानाला विशेष महत्व आहे. तर कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य (संग्रहित छायाचित्र)

  • मेष (Aries) : आठवड्याच्या सुरूवातीस आपणास आर्थिक बाबी, रोजगार, कारकीर्द आणि व्यापार ह्यात प्रगतीची संधी मिळेल. आपण जर वेळेचं योग्य नियोजन केलं तर आपणास अपेक्षित यश प्राप्त होईल. आपल्या मित्रांच्या मदतीनं आपली स्थगित कामे पूर्ण होतील. आपण जर राजकारणात असाल तर आठवड्याच्या अखेरपर्यंत एखादी महत्वाची जबाबदारी किंवा पद प्राप्त होऊ शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यापाऱ्यांना निव्वळ अपेक्षित लाभच होणार नाही. तर त्यांना आपला व्यवसाय विस्तार करण्याची संधी सुद्धा मिळेल. ह्या दरम्यान नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अतिरिक्त प्राप्तीचं स्रोत सुद्धा मिळतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. प्रेमसंबंध प्रगल्भ होतील. दांपत्य जीवन आनंदमय असेल. कुटुंबियांसह हसत-खेळत वेळ घालविण्याची संधी सुद्धा आपणास मिळेल. प्रकृती सामान्यच राहील.
  • वृषभ (Taurus) :या आठवड्यात आपणास घरी तसेच बाहेर लहान-सहान गोष्टींकडं दुर्लक्ष करावं लागेल. कार्यक्षेत्रील आपले विरोधक आपले लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. आपणास अनपेक्षितपणे एखादा प्रवास करावा लागू शकतो, ज्यात वेळेचा आणि पैश्याचा अपव्यय होण्याची संभावना आहे. आठवड्याच्या मध्यास घर दुरुस्तीसाठी खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपलं अंदाजपत्र खिळखिळे होऊ शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात आपणास सर्तक राहावं लागेल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल असू शकतो. गैरसमजामुळं प्रेमिकेशी आपले मतभेद होऊ शकतात. असं असलं तरी एखाद्या महिला मित्राच्या मदतीनं ते दूर करण्यात आपण यशस्वी होऊन आठवड्याच्या अखेरीस आपले प्रेमसंबंध पुन्हा दृढ करू शकाल. आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीमुळं आपलं मन काहीसे चिंतीत होऊ शकते.
  • मिथुन (Gemini) : या आठवड्यात आपणास अतिरिक्त परिश्रम आणि प्रयत्न करावे लागतील, जेणेकरून कोणत्याही कार्यात आपण यशस्वी होऊ शकाल. ह्या आठवड्यात ऋतुजन्य विकार किंवा जुनाट आजार उफाळून येण्याची संभावना असल्यानं आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची नवीन ठिकाणी बदली झाल्यानं किंवा जबरदस्तीनं जबाबदारी मिळाल्यानं त्यांचं मन काहीसे खिन्न होऊ शकतं. आठवड्याच्या उत्तरार्धात कारकिर्द किंवा व्यापारानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात आपणास कुटुंबियांचं आणि मित्रांचं पूर्ण सहकार्य मिळेल. आपले जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडले असेल तर कुटुंबीय आपल्या प्रेम विवाहावर शिक्का मोर्तब करू शकतात. आठवड्याच्या अखेरपर्यंत मुलांसंबंधी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते, ज्यामुळं घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आरोग्याच्यादृष्टीनं आपणास आपला आहार आणि दिनचर्यायाकडं लक्ष द्यावं लागेल.
  • कर्क (Cancer) : या आठवड्यात व्यापारात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. बाजारात अडकलेल्या पैश्यांच्या चिंतेमुळं आपली चिडचिड होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना सुद्धा कार्यक्षेत्री काही समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आपणास प्राप्तीच्या प्रमाणात खर्चांवर नियंत्रण ठेवावं लागेल. प्रकृतीकडं लक्ष द्यावं. वाहन चालवताना सावध राहावं. ह्या दरम्यान आजारपण, दुखापत किंवा अन्य समस्या संभवतात. जुने आजार पुन्हा उफाळू शकतात. प्रेमसंबंधात सावध राहावं. आपल्या प्रेमिकेच्या भावनांचा आदर राखावा. आपले प्रेमसंबंध उत्तम प्रकारे जपून ठेवावेत, अन्यथा विविध प्रकारच्या समस्यांचा सामना आपणास करावा लागू शकतो. मुलांसंबंधी एखादी बाब आपल्या काळजीस कारणीभूत ठरू शकते. असं सर्वकाही असले तरी कठीण प्रसंगी आपला वैवाहिक जोडीदार आपल्या पाठीशी सावली प्रमाणे उभा राहील.
  • सिंह (Leo) : या आठवड्यात कोणत्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी आपणास अतिरिक्त परिश्रम आणि प्रयत्न करावे लागतील. आपल्या कार्यक्षेत्री गुप्त शत्रूपासून सतर्क राहावे लागेल. आठवड्याच्या मध्यास कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबरोबर मतभेद होण्याची संभावना असल्याचं लक्षात ठेवावं. हे मतभेद दूर करण्यासाठी आपणास संवादात्मक आणि समजूतदारपणा दाखवावा लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यवसायानिमित्त केलेले प्रवास सुखद आणि लाभदायी होतील. त्यामुळं आपणास भविष्यात एखाद्या लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात आपण आणि आपली प्रेमिका या दरम्यान काही गैरसमज होऊ शकतात, परंतु ते दूर करण्यासाठी आपणास वाद घालण्या ऐवजी संवाद साधावा लागेल. आपण जर तसे केले नाहीत तर आपल्या संबंधात दुरावा येऊन चांगले असलेले संबंध कायमचे दुरावू शकतात. आपले वैवाहिक जीवन सुखद व्हावे म्हणून आपण जोडीदाराच्या भावनांकडं दुर्लक्ष करू नये.
  • कन्या (Virgo): या आठवड्यात कुटुंब आणि कार्यक्षेत्राशी संबंधित कोणताही निर्णय आपण भावनेच्या भरात घेऊ नये. आठवड्याच्या मध्यास कामानिमित्त आपणास एखादा दूरवरचा प्रवास करावा लागू शकतो. ह्या प्रवासादरम्यान आपणास आपल्या प्रकृतीची आणइ सामानाची काळजी घ्यावी लागेल. पैतृक संपत्तीशी संबंधित काही वाद संभवत असल्यानं आपण तक्रारीस वाव देऊ नये. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा काहीसा आव्हानात्मक होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना एखादे विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. आपल्या प्राप्तीपेक्षा खर्चाचे प्रमाण जास्त असल्यामुळं आपण काहीसे उदास व्हाल. प्रणयी जीवनात आपणास आपल्या प्रेमिकेशी एकनिष्ठ राहावं लागेल. प्रेमात विचारपूर्वक पाऊल उचलावे, अन्यथा आपणास समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपल्या वैवाहिक जोडीदाराची प्रकृती व मुलांच्या भविष्याची काळजी ह्यामुळं आपण चिंतीत होऊ शकता. परंतु, आपण चिंतीत न होता त्यांची योग्य काळजी घेण्यावर भर द्यावा.
  • तूळ (Libra) : या आठवड्यात आपलं लक्ष विचलित होणार नाही ह्याची दक्षता आपणास घ्यावी लागेल. आठवड्याच्या सुरूवातीस घर दुरुस्ती किंवा घरासाठी उपयुक्त वस्तूंची खरेदी ह्यात जास्त खर्च होण्याची संभावना आहे. कठोर परिश्रम करूनच आपणास धन प्राप्ती होण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांना बाजारात अडकलेले पैसे परत मिळविण्यात त्रास होण्याच्या शक्यतेमुळं त्यांनी आर्थिक देवाण-घेवाण करताना सावध राहावं. आठवड्याच्या मध्यास विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. युवकांचा बहुतांश वेळ मनोरंजनात जाईल. आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरी करणाऱ्यांच्या जीवनात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हा आठवडा शुभ फलदायी आहे. जमीन किंवा घराच्या खरेदी - विक्रीची योजना तयार करण्यास हा आठवडा अनुकूल आहे. प्रेमसंबंध प्रगल्भ होत असल्याचं दिसून येईल. प्रेमिकेशी प्रेम आणि सामंजस्य सुधारेल. दांपत्य जीवन सुखद होईल.
  • वृश्चिक (Scorpio) : या आठवड्यात आपणास आळस आणि अहंकार दूर सारण्याचा प्रयत्न करावा लागेल, अन्यथा आपल्या समोर येणाऱ्या सुवर्ण संधी हातून निसटून जातील. कामात विशेष यश प्राप्तीसाठी आपल्या वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य नियोजन आपणास करावे लागेल. निर्धारित ध्येय पूर्ण करण्यात आपली प्रकृती प्रभावित होऊ शकते, तेव्हा त्याची काळजी घ्यावी. आठवड्याच्या मध्यास व्यापाऱ्यांना चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. परीक्षेत आणि स्पर्धेत अपेक्षित यश प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांना भरपूर परिश्रम करावं लागतील. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या भेटीचा लाभ, भविष्यात होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती किंवा बदली संभवते. वैवाहिक जोडीदाराच्या एखाद्या मोठ्या साध्यतेमुळं घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी प्रेम आणि सामंजस्य टिकून राहील.
  • धनु (Sagittarius) : या आठवड्याची सुरूवात कामातील उत्साहानं होईल. आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी आपणास अधिक प्रयत्नशील राहावे लागेल. दीर्घ काळापासून स्थगित झालेले एखादे काम आपण एखाद्या व्यक्तीच्या किंवा आपल्या मित्राच्या मदतीनं पूर्ण करू शकाल. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांना एखाद्या चांगल्या संधीचा शोध घेण्यात यश प्राप्त होऊ शकते. आपल्या कारकिर्दीत किंवा व्यवसायात प्रगती करण्यात एखाद्या मित्राची महत्वाची भूमिका असू शकते. आपणास आपले प्रेम व्यक्त करण्याची इच्छा असेल तर ह्या आठवड्यात ती व्यक्त करण्यात आपण यशस्वी होऊ शकता. जे प्रणयी जीवन जगत आहेत त्यांच्यात सामंजस्य वाढेल. आपल्या प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी आपणास मिळेल. कुटुंबियांसह एखादी सहल संभवते. प्रकृती सामान्यच राहील.
  • मकर (Capricorn) : या आठवड्यात आपणास आपले संबंध आणि प्रकृतीयाकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. जर जमीन, घर किंवा संपत्तीशी संबंधित एखादा वाद असेल तर कोर्टात जाण्या ऐवजी सामंजस्य दाखवून बाहेरच त्याचे निराकरण करणं उपयुक्त ठरेल. कार्यक्षेत्री वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचे अपेक्षेनुसार सहकार्य न मिळण्याची स्थिती निर्माण होईल. ह्या दरम्यान व्यापाऱ्यांना आर्थिक देवाण-घेवाण करताना सावध राहावं लागेल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने कौटुंबिक आणि व्यावसायिक समस्यांचं निराकरण करण्यात आपण यशस्वी होण्याची संभावना आहे. ह्या दरम्यान संततीशी संबंधित एखादे यश आपल्या आनंदास आणि सन्मानास कारणीभूत ठरू शकते. प्रेमसंबंध दृढ होतील. कदाचित कुटुंबीय आपल्या प्रेमाचा स्वीकार करून विवाहास मान्यता देतील. वैवाहिक जोडीदारासह आपण एखादी तीर्थ यात्रा करू शकता. आहार आणि आपली दिनचर्या ह्यावर विशेष लक्ष द्यावं.
  • कुंभ (Aquarius) : हा आठवडा आपल्यासाठी आव्हानात्मक असू शकतो. कर्ज, रोग व शत्रू हात धुवून आपल्या मागे लागण्याची शक्यता असल्यानं आपणास आपल्या आर्थिक स्थितीवर विशेष लक्ष द्यावं लागेल. आपल्या अंदाजपत्रावर दबाव येऊ शकतो. इतकेच नव्हे तर कर्ज घेण्याची स्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. त्यामुळं संबंधित खर्चांवर नियंत्रण ठेवून आर्थिक नियमांचं पालन करावं लागेल. आपण जर व्यापारात प्रगती करण्याचा विचार करत असाल तर एखाद्या अनुभवी व्यक्तीचा किंवा हितचिंतकाचा सल्ला घेणं उपयुक्त ठरेल. प्रणयी जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळं आपण त्रस्त व्हाल. कौटुंबिक समस्यांमुळं आपले वैवाहिक जीवन प्रभावित होऊ शकते. अशावेळी संवेदनशीलता आणि शंका समजून घेण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रसंगी आपली संवाद क्षमता आणि आपलं सहकार्य महत्वाचं ठरेल. सर्व समस्यांत शांतता आणि सामंजस्य दाखविण्याचा प्रयत्न करावा.
  • मीन (Pisces) : या आठवड्यात आपणास एखादा महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल. आपणास हितचिंकांचा सल्ला आणि कुटुंबियांचा प्रस्ताव ह्यावर लक्ष द्यावं लागेल. व्यावसायिक बाबीत सुद्धा सावध राहावं. व्यापारात आपणास चढ-उतार पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. अर्थात हा व्यापाराचाच एक भाग असल्यानं घाबरून जाण्याची गरज नाही, परंतु त्यावर नियंत्रण ठेवण्याची तयारी असली पाहिजे. असं केल्यास येणाऱ्या कालखंडात परिस्थिती आपल्या नियंत्रणात येईल. जर आपल्या प्रणयी जीवनात किंवा वैवाहिक जीवनात एखादी समस्या निर्माण झाली असेल तर संवाद साधून त्याचे निराकरण करावं. अन्यथा कटुता निर्माण होऊ शकते. अशा प्रसंगी आपल्या आनंदात खोडा घालणाऱ्या व्यक्तींपासून आपणास दूर राहावं लागेल. आठवड्याच्या अखेरीस आपणास एखाद्या मांगलिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आपल्या जीवनातील सुखद व महत्वपूर्ण अनुभवाच्या रूपात ह्या संधीचा स्वीकार आपण करावा.

हेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details