मेष (ARIES) :आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या भावात असणार आहे. आज आपणास सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक आणि दांपत्य जीवनात सौख्य लाभेल. वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल. विचारात अधिकाराची भावना वाढेल. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी प्राप्त होईल. समाधानी वृत्ती बाळगणे आवश्यक राहील. आजचा दिवस व्यापार्यांसाठी लाभदायी आहे.
वृषभ (TAURUS) :आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या भावात असणार आहे. आज शारीरिक, मानसिक स्वास्थ्य सांभाळून नियोजित कामे ठरल्याप्रमाणे पूर्ण करू शकाल. आजारी व्यक्तींना आज प्रकृतीत सुधारणा जाणवेल. आईच्या घराण्याकडून चांगली बातमी समजेल. कामाच्याठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. अडलेली कामे आज पूर्ण होतील.
मिथुन (GEMINI) :आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम हाती घेऊ शकाल. पत्नी आणि संततीविषयी चिंता वाटून मनात उद्विग्नता येईल. अजीर्ण झाल्याने प्रकृती नरम-गरम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस आहे. शक्यतो वादविवाद टाळावेत. मतभेद संभवतात. मानहानी सुद्धा संभवते.
कर्क (CANCER) :आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज आपल्यात आनंद आणि स्फूर्ती ह्यांचा अभाव दिसून येईल. मन खिन्न होईल. छातीत दुखणं किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल. सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. पैसा खर्च होईल. पाण्यापासून दूर राहा.
सिंह (LEO) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे. कामात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यामुळं मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील. मित्रासोबत एखाद्या रमणीय पर्यटनस्थळी फिरण्याचा आनंद घेऊ शकाल. प्रकृती सुद्धा एकदम उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. नवे कार्य हाती घेण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.
कन्या (VIRGO) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या मधुर वाणीचा इतरांच्या मनावर सकारात्मक प्रभाव होईल. घरगुती वातावरण चांगले राहील. बोलण्यावर ताबा ठेवल्यानं वादविवाद होणार नाहीत. आर्थिक कामे मनासारखी पार पडतील. नकारात्मक विचारांपासून दूर राहावे लागेल. मित्रांची भेट होईल. छोटासा प्रवास घडेल.
तूळ (LIBRA) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज आपल्या प्रत्येक कामात आत्मविश्वास असल्याचे दिसून येईल. आर्थिक योजना व्यवस्थित करू शकाल. शारीरिक, मानसिक शांतता लाभेल. वस्त्रे, अलंकार, आनंद, उल्हास ह्यासाठी खर्च होईल. वैचारिक वाढ होईल. रचनात्मक कार्यात मन रमेल.